ब्रेकिंग न्यूज

अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नामुळे पाडळसिंगी- लोखंडी सावरगाव रस्ता कामाला निधी मंजूर

श्रेय लाटणा-यांनो उघडा डोळे बघा निट

गेवराई दि. २१ (प्रतिनिधी) सत्ता असो नसो विकास हाच ध्यास घेऊन माजी आमदार अमरसिंह पंडित गेवराई तालुक्यात विकास निधी खेचून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पाडळसिंगी- कुकडगाव – पिंपळनेर ते लोखंडी सावरगाव या रस्ता कामाला महाविकास आघाडी सरकारने लाखो रुपयाचा निधी मंजूर केला आहे. अमरसिंह पंडित यांचे तालुकाभर आभार व्यक्त केले जात आहे. श्रेय लाटणा-या विरोधकांनो उघडा डोळे बघा निट असा सवाल कार्यकर्ते करत आहेत.

विद्यमान लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम अमरसिंह पंडित यांनी केले आहे. पाडळसिंगी-कुकडगाव- पिंपळनेर ते लोखंडी सावरगाव या रस्ता कामाला महाविकास आघाडी सरकारने निधी मंजूर केला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनजंय, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सदर रस्ता कामाला निधी देण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती. त्या मागणीला यश आले आहे, परंतु काही लोक श्रेय घेण्याच्या हेतूने उठाठेव करत आहेत. गेवराईचे विद्यमान आमदार यांनी दत्तक घेतलेले मुळकवाडी गावाचा छोटासा रस्ता त्यांना करता आला नाही आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे खरे श्रेय महविकास आघाडी सरकारचे आहे कोणी काही विकास काम केलं तर मीच केलं अशी सवय बंद करावी. विद्यमान आमदाराला कंटाळून आनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस क्षात प्रवेश करत आहेत. लोकप्रिय नेते अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाचा विजय आहे.

रस्ता कामासाठी दिलेल्या निधी बद्दल जाणते राजे शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ना. धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आणि महावीकास आघाडी सरकारचे गेवराई तालूक्यातून आभार मानले जात आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button