बीड जिल्हा

समाजपयोगी उपक्रमाने विजयसिंह पंडित यांचा वाढदिवस साजरा

आँनलाईन शुभेच्छांचा शिवछत्रावर पाऊस

बीड दि.२१ ( प्रतिनिधी) बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी गेवराई आणि बीड येथे विविध समाजपयोगी उपक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन करत घेतले. यावेळी विजयसिंह पंडित यांच्यावर प्रत्यक्ष आणि आँनलाईन पद्धतीने शुभेच्छांचा पाऊस पडला.

रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जनाधार प्रतिष्ठाणच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अनुप मंत्री, शहाजी वरवट, अजित कुडके, विनोद कोळी, विजय चांदणे, जय चांदणे आदी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र नारायणगड येथे वृक्षारोपण

विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र नारायणगड येथे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराईचे माजी सभापती बबनरावमुळे , खडकिचे माजी सरपंच विकास सानप ,भगवान पवार , श्रीकांत दातखिळ, बळीराज शेळके तसेच कर्मचारीउपस्थित होते.

सन्मान कोव्हीड योद्ध्यांचा

          आपण सर्वजण कोरोना या महाभयंकर संसर्गाच्या विरोधात गेले अनेक महिने लढत आहोत. आपल्या जवळच्या मित्र परिवारतील, नातेवाईक आदी कोरोनाबाधित व्यक्तींना आपण मुकलो आहोत परंतु भरपूर रुग्णांना ज्या यंत्रणेने उपचार करून ह्या आजारातून बरे केले असे आरोग्य विभागाचे कर्मचारी, चकलांबा प्राथमिक केंद्रातील सर्व स्टाफ, माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हे मध्ये महत्वाची भूमिका असलेल्या माझ्या भगिणी आशा वर्कर, आंगणवाडी सेवीका, एम्ब्युलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, शिक्षक वर्ग, पत्रकार , प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस, ग्रामसेवक तसेच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेत कोरोना लढाईत काम करीत असलेले स्वयंसेवक ह्यांनी कोरोनाच्या काळात आपले बजावलेले कर्तव्य म्हणून सर्व यंत्रणेचे आभार व्यक्त करून त्यांचा सन्मान-सत्कार सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये चकलांबा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय कदम, डाॅ.धनाजी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी चकलांबा, डाॅ. मुकेश कुचेरिया वैद्यकीय अधीकारी तलवाडा, डाॅ. समीर आढाव वैद्यकीय अधिकारी उमापुर, राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर माजी जि.प. सदस्य डाॅ.विजयकुमार घाडगे, पंचायत समिती सदस्य तय्यबभाई शेख, प्राथमीक आरोग्य कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका, पत्रकार बांधव उपस्थीत होते.

कोरोना योध्दा पुरस्कार २०२०

विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना या महामारीच्या काळामध्ये जातेगाव गटामध्ये ज्यांनी ज्यांनी भरीव योगदान दिले अशा विस ते पंचवीस जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे दत्ता वाघमारे व राधेश्याम लेंडाळ यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्कार २०२० हे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सहारा बालग्राम येथे कार्यक्रम

विजयसिंहपंडित यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही सहारा बालग्राम येथील मुलांना मडके परिवारांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाम काका येवले, दत्ताभाऊ पिसाळ, दत्ताभाऊ दाभाडे, गोरक्षनाथ शिंदे, शेख मन्सूर भाई, अनिल मोटे, राजाभाऊ कळसाई, पंकज पाटेकर, अंगद माने, शेखर मोटे, अँड. प्रदीप मडके, अजय भैय्या बने, बाबा शिंदे, संग्राम पंडित, ऋषिकेश मोटे, गोटू वाघमारे, अक्षय काळे, अक्षय परदेशी उपस्थित होते.

मास्क वाटप

जि. प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त बहिरवाडी, नवा मोंढा, कुर्ला रोड, बीड येथे अँड. हेमाताई पिंपळे, श्रीमती विद्याताई जाधव (राष्ट्रवादी युवती बीड जिल्हा अध्यक्षा) विक्रम कसबे व अशोक भाऊ चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मास्क वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विजय चांदणे, जनार्दन चांदणे, विलास चांदणे, सुनिल चांदणे, अमोल चांदणे, रवि कानडे, प्रदिप चांदणे, सोहम चांदणे, जय चांदणे आदी उपस्थित होते.

फराळ व किट वाटप

विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कांता नवपुते, किसन पंडित व मच्छिंद्र गावडे यांच्या हस्ते ५१ गरजूना फराळ किट चे वाटप करण्यात येऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button