गेवराई

आळंदी कार्तिकी वारीस परवानगी देवून वारकरी कार्यक्रम सुरु करा

अखिल भारतीय वारकरी मंडळाची आ.रोहीत पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी

गेवराई: आळंदी येथील कार्तिकी वारीस परवानगी देवून वारकरी कार्यक्रम सुरु करा यासह वारकऱ्यांच्या आदि मागण्यांबाबत आ.रोहित पवार यांना अखिल भारतीय वारकरी मंडळ गेवराई तालुका युवा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवा समिती प्रमुख अक्षय महाराज पालेकर, युवा समिती सचिव किरण महाराज मोटे यांच्यासह आदि उपस्थित होते.
देशात व राज्यात सुरु असलेल्या कोषित -१९ या रोगाच्या प्रादुर्भावाने वारकऱ्यांचा प्राण असणारी आषाढी वारी रद्द झाली, त्यावेळेस संपूर्ण देशात व राज्यात लाॅकडाऊन होते. परंतु आता संपूर्ण राज्यामध्ये अनलाॅक झाले आहे. सर्व बाजारपेठा नाट्यगृह , मौल , हॉटेल , रेस्टोरंट व पाडव्या पासून सर्व धार्मिक स्थळे आणि मंदिर सुरु झालेली आहेत मग कार्तिकी वारीला निर्बंध का ? वारी हि वारकऱ्यांचा प्राण आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी! साधन निर्धारी आण नाही!! म्हणून आळंदींची कार्तिकी वारी अर्थात विश्व माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा काही मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित का होईना शासनाच्या नियमाच्या आटी शर्तीच्या अधीन राहून आम्ही साजरा करु आणि पहिल्या सारखीच आनंदात कार्तिकी वारी व्हावी , त्यासाठी विधानसभेत तुम्ही हा प्रश्न उपस्थित करावा हीच आम्हा सर्व वारकऱ्यांची सदिच्छा पंढरीचा वारकरी ! वारी चुको न दे हरी !! असे निवेदनात अखिल भारतीय वारकरी मंडळ गेवराई तालुका युवा समितीच्या वतीने म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष कृष्णा महाराज राऊत, युवा समिती प्रमुख अक्षय महाराज पालेकर, युवा समिती सचिव
किरण महाराज मोटे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button