ब्रेकिंग न्यूज

रब्बी पिकांचा विमा उतरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

बीड,दि. 24 :- (जि.मा.का) कृषि व पद्रुन विभागाचा शासन निर्णय दिनांक 17 जूलै 2020 जिल्हयासाठी सन 2020-21 खरीप व रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली असून योजने करीता पुढील तीन वर्षासाठी (2020-21 ते 2022-23) खरीप व रब्बी हंगामासाठी भारतीय कृषि विमा कंपनी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी काम करणार आहे. या योजनेमुळे बीड जिल्हयातील रब्बी हंगामातील 05 पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना या वर्षापासून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. रब्बी पिकांचा विमा उतरविण्याची अंतिम तारीख रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) 30 नोव्हेंबर 2020 अशी आहे. तर गहू (बा.), हरभरा व रब्बी कांदा यासाठी 15 डिसेंबर 2020 अशी आहे.

शेतकऱ्यांना प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबी करीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून गाव पातळीवर अधिकची सुविधा म्हणून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राद्वारे, महा-ई-सेवा केंद्राद्वारे सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी शक्यतो बँकेत जाणे टाळावे.

पिक, विमा संरक्षित रक्कम (रु.प्रति हे.), शेतकरी विमा हप्ता रक्कम (रु.प्रति हे.) पुढील प्रमाणे- ज्वारी बा. -रु.30000/-, रु.450/-, ज्वारी जि. रु.28000/-, रु.420/-, गहू बा. – रु.38000/-, रु.570/-, हरभरा- रु. 35000/-, रु.525/-, रब्बी कांदा- रु. 80000/-, रु.4000/-.

पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, बँक पासबूकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स, जमिनीचा सातबारा उतारा, स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी लाभ घ्यावयाचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतकऱ्याचा करारनामा.

सदरील योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एैच्छिक आहे. तथापी कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसुचित पिकाचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेच्या सहभागाच्या अंतीम दिनांकापुर्वी 7 दिवस संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरुन देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या अधिसुचित पिकांचा विमा संबंधित बँकामार्फत करण्यात येईल. त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामात आपल्या पिकांचा विमा न करणेबाबत घोषणापत्र आपल्या बँक शाखेत दिले असल्यास चालु हंगामात विमा करण्यासाठी विहित नमुन्यातील घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कमे व्यतीरिक्त कोणतीही जादाची रक्कम संबंधित महा-ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र यांना देण्यात येऊ नये. पिक विमा भरल्यानंतर विम्याची पावती आवश्य घ्यावी. त्यावरील भरलेली रक्कम, पिकांचे क्षेत्र, पिकाचे नाव, बँक खाते क्र., आय.एफ.सी. कोड व मोबाईल क्र. इत्यादी बाबी तपासुन घ्याव्यात. पिक विमा भरण्यासाठी काही अडचणी उद्भवल्यास संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

सर्व ग्राहक सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशीही 24 तास सुरु राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांने लवकर विमा भरण्याची प्रक्रीया पुर्ण करुन घ्यावी. विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विमा भरण्याची प्रक्रीया पुर्ण करावी. प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र व विमा क्षेत्र या मध्ये तफावत आढळल्यास शेतकऱ्यांना मिळणारी पिक विमा रक्कम ही कमी असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढ्या क्षेत्रावर पेरणी केलेली आहे तेवढेच क्षेत्र नमुद करावे. चुक होऊ देऊ नये. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिकच्या सविस्तर माहितीसाठी विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, क्षेत्रीय कर्मचारी व सेतु सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button