ब्रेकिंग न्यूज

जिल्हयातील सरपंच पदे आरक्षणाची अधिसूचना जारी

बीड,दि. 24 : ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. ग्रापनि-20/प्र.क्र.06/पंरा-2 दिनांक 5 मार्च 2020 अन्वये दिलेले सुचनेप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 च्या नियम 3 (अ) प्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी पाच वर्षाकरीता (2020 ते 2025 या दरम्यान गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता) आरक्षित करुन संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार आरक्षित केलेली सरपंचाची पदे तालुकानिहाय आरक्षण अधिसुचित करण्यात येत आहे. अशी अधिसूचना जिल्हाधिकारी बीड यांनी प्रसिध्द केली आहे असे तहसिलदार (सामान्य शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button