गेवराईराजकीय

सतिष चव्हाणांच्या विजयासाठी अमरसिंह पंडितांची फिल्डिंग टाईट

मादळमोही येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मतदारांशी गाठीभेटी

सतिष चव्हाणांच्या विजयासाठी अमरसिंह पंडितांची फिल्डिंग टाईट
=================
मादळमोही येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मतदारांशी गाठीभेटी
=================
गेवराई, दि. २० (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार सतिष चव्हाण यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यात फिल्डिंग टाईट केली असून त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सतिश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान सतिश चव्हाण यांना सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मादळमोही येथे आज दि. २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी माजी सभापती बबनराव मुळे, जयभवानी कारखान्याचे संचालक राजेंद्र वारंगे, दिपक वारंगे, बळीराम रसाळ बापू, शेख मन्सुर, शेख समशेर, अशोक जगताप, आरुण वाघमारे, शेख अबूबकर, आदिल पठाण, बब्बूभाई शेख, करीम शेख, आनंद सरपते, सुनिल पुरी आदीनी मादळमोही येथील मोहिमात विद्यालय, अख्तर सज्जाद उर्दू हायस्कूल आणि जुनियर कॉलेज आणि परिसरातील पदविधर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सतिश चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र निकम, भगवान पाटील, भिमा सरपते, महादेव तळेकर, सोमेश्वर गचांडे, शकिल पठाण, मिसाळ सर, प्रा. डॉ. बाळासाहेब सरपते, श्रीमती लीना शिखरे, श्रीमती राऊत, श्रीमती सीमा सरपते, श्रीमती मुंडे, मुख्याध्यापक मिर्झा मन्सुर बेग, शेख मजहर, शेख तय्यब, श्रीमती नौशाद, मजहर बेग, श्रीमती शहनाज, श्रीमती रुबीना श्रीमती उजमा,नदीम बेग, आर्शियान बेग लियाकत बेग, काझी ईकरार, मोहम्मद सादिक, युसुफ शेख, मोहम्मद खलील, श्रीमती अफरोज, श्रीमती हुमेरा, शेख सादिक इब्राहिम
यांच्यासह पदवीधर मतदार आणि कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्व नियमांचे पालन करून तसेच सामाजिक अंतर ठेवून गाठीभेटी घेण्यात आल्या. दरम्यान यावेळी सतिश चव्हाण यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यात फिल्डिंग टाईट केल्यामुळे सतिश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्य या भागातून मिळणार आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button