बीड

घाटसावळी एसबीआय शाखेअंतर्गत गावांमधील शेतकऱ्यांच्या मदतीला आ विनायक मेटे धावून आले

प्रलंबित ४५० प्रकरणांतील १५० मंजूर उर्वरित लवकरच होणार; शेतकऱ्यांकडून आ मेटे यांचे आभार व समाधान !

घाटसावळी एसबीआय शाखेअंतर्गत गावांमधील शेतकऱ्यांच्या मदतीला आ विनायक मेटे धावून आले
———
प्रलंबित ४५० प्रकरणांतील १५० मंजूर उर्वरित लवकरच होणार; शेतकऱ्यांकडून आ मेटे यांचे आभार व समाधान !
———
शाखाव्यवस्थापक केदार यांची कार्यतत्परता शेतकऱ्यांच्या मदतीला आली  – बळीभाऊ थापडे, उल्हास घोरड, नितीन थोरात
———-
बीड(प्रतिनिधी):- बऱ्याच महिन्यांपासून घाटसावळी एसबीआय शाखेअंतर्गत असलेल्या आंबेसावळी, घाटसावळी, ढेकणमोहा, ब्रम्हगाव, पोखरी या गावातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाबाबतचे प्रस्ताव दाखल करूनही सुपीककर्ज मिळत नव्हते. याबाबत आ विनायकराव मेटे साहेबांकडे काही शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर आ मेटे साहेबांनी शाखा व्यवस्थापक श्री केदार साहेबांशी संपर्क केला. घाटसावळी शाखेतून संपूर्ण प्रकरणे बीड येथील मुख्य शाखेकडे पाठवण्यात आलेली आहेत, तेथून मंजुरी मिळाली कि आपण पीककर्जाचें वाटप करू शकतोत असं श्री केदार यांनी कळवल्यानंतर आ विनायकरावजी मेटे साहेबांनी दि ०९ नोव्हेंबर २०२० रोजी बीड येथील मुख्य शाखा व्यवस्थापकांना तपासणीसाठी आलेल्या ४५० प्रकरणांना लवकरात लवकर तपासून पीककर्जांना मंजुरी द्यावी असे पत्र दिले होते. या पत्रानंतर बँक व्यवस्थापनाने तात्काळ दखल घेतली आहे.
जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे व तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. यानंतर मुख्य शाखेने दखल घेऊन १५० शेतकऱ्यांच्या पीककर्जाला मंजुरी दिली असून उर्वरित प्रकरने ५ ते ६ दिवसांत मार्गी लावण्यात येणार असल्याचे आ विनायकराव मेटे साहेबांचे स्वीय सहायक श्री धनंजय गुंदेकर यांना शाखा व्यवस्थापक श्री केदार यांनी सांगितलं आहे. आंबेसावळी, घाटसावळी, ढेकणमोहा, ब्रम्हगाव, पोखरी या गावातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीने आ विनायकराव मेटे साहेबांचे आभार मानण्यात येत असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यतत्पर शाखाव्यवस्थापक श्री केदार साहेब तसेच शेतकऱ्यांना सातत्याने मदत करणाऱ्या श्री सुनील लांडे यांचे आभार वरील गावातील सर्व पात्र शेतकरी, शिवसंग्रामचे योगेश शेळके, सर्कलप्रमुख बळीभाऊ थापडे, उल्हास घोरड, सुनील थोरात, मसू काळे, बालाजी गुंदेकर, अविनाश गुंदेकर, महेंद्र निसर्गन्ध यांनी मानले आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button