केज

सा.विश्वरूद्राच्या दिवाळी अंकाचे केज येथे थाटात प्रकाशन..

सा.विश्वरूद्राच्या दिवाळी अंकाचे केज येथे थाटात प्रकाशन..
================================
केज ,(प्रतिनिधी)

कोरोना नंतर जनजिवन हळूहळू पुर्वपदावर येत असले तरी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.सर्वच जण त्यामुळे अडचणीत आले होते. त्यात सोशल मिडीया मुळे तर अगोदरच प्रिंट मिडीया आर्थिक संकटात आहे. वर्तमानपत्राचा कमाईचा सर्वात मोठा सण म्हणजे दिपावली .वर्तमान पत्रातून ज्यांची वर्षभर प्रसिध्दी केली जाते.त्याचा मोबदला म्हणून दिवाळी अंकात त्यांची हक्काने जाहिरात घेतली जाते. मग ते राजकीय असोत की सामाजिक किंवा व्यवसायीक यांच्या जाहिरातीवरच वर्तमानपत्र तरलेले असते. कारण जाहिरात हा वर्तमानपत्त्राचा आत्मा असल्याने त्याशिवाय हा व्यवसाय चालने शक्य नसते. परंतु यावेळेस मात्र कोरोना व लॉकडाऊनचे कारण पुढे करत जाहिराती चे प्रमाण फारच कमी झाले.त्यातुनही कसेबसे सावरत मिळेल त्यावर समाधान मानत वर्तमानपत्रांनी आपापले दिवाळी अंक काढले आहेत. म्हणून काल दि.२४ नोंहेबर रोजी सा.विश्वरूद्रा बीडच्या दिवाळी विशेषांकाचे आदर्श पत्रकार समीती केज व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केज येथे नुकतेच थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बळीरामजी सोनवणे,जेष्ठ नेते बाबासाहेबजी अहिरे , ऊपाध्यक्ष दिनेशजी गायकवाड ,जिल्हा महासचिव सय्यद रज्जाक ,ता.अध्यक्ष गोपीनाथजी ईनकर , प्रकाश सोनवणे ,आश्रुबा तुपारे ,आण्णा घोडके, प्रा.आदमाने सर ,सदाशिव जोगदंड आणि पक्षाचे पदाधिकारी तसेच आदर्श पत्रकार समीतीचे सदस्य व दै.आदर्श गावकरीचे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, पत्रकार महादेव काळे आणि मित्र परिवार ऊपस्थित होते. यावेळी सर्वांनी सा.विश्वरूद्रा हा विशेषांक सुंदर व उत्कृष्ट काढल्यामुळे या दिवाळी विशेषांकाचे कौतुक केले आहे.

 

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button