आरोग्य व शिक्षणगेवराई

कोरोना 19 रोखण्यासाठी शिव शारदा पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची कडक तपासणी !

कोरोना 19 रोखण्यासाठी शिव शारदा पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची कडक तपासणी !

गढी :- राज्य सरकारच्या सुचनेनुसार 23नोव्हेबर पासून ईयत्ता 9वी ते 12वी पर्यंत च्या शाळा सुरू झाल्या आहेत. शिव शारदा पब्लिक स्कूल गढी या शाळेत कोरोना -19 या साथरोग आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, विद्यार्थ्यांची कडक तपासणी केली जात आहे. शिव शारदा पब्लिक स्कूल गढी हि नाव लौकीक असलेली शाळा आहे. इयत्ता नववी व दहावीचे 195 विद्यार्थी आॅनलाइन क्लास द्वारे शिक्षन घेत होते. शाळेने कोव्हिड- 19 रोखण्यासाठी खबरदारी घेत, शाळेच्या मुख्य द्वारावरच तापमान व इतर बारीक सारीक लक्षणा विषयी माहिती घेऊन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत असल्याने, पालक व विद्यार्थी यांच्या मनातील भिती नाहीशी झाली असल्याने दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी RT-PCR टेस्ट अगोदर केलेली आहे. दररोज विद्यार्थी बसत असलेले वर्ग सॅनीटाईज केले जातात. विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी साबण पाणी तसेच सॅनिटायझर ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राचार्य एन.पी.दत्ता हे स्वत: विद्यार्थ्यांच्या आगमना पासून शाळेतुन बाहेर पडे पर्यंत विद्यार्थ्यांना सुचना देत त्यांची जातीने काळजी घेत आहेत. तसेच ते सोशल मिडिया च्या माध्यमातून आपल्या पाल्यास शाळेला पाठवण्यासाठी सर्व पालकांना आवाहन करत आहेत व सर्व खबरदारी व आरोग्य विभागाच्या सुचना व नियमांचे पालन करण्याची विनंती सर्वांना करत आहेत. शाळेच्या या शिस्तबद्ध नियोजना बद्दल प्राचार्य एन.पी.दत्ता व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना पालक धन्यवाद देत आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button