महाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करत संविधान दिवस साजरा

आष्टीसह परिसरात विविध ठिकाणी संविधान प्रस्ताविकेचे वाचन

संविधान दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करत संविधान दिवस साजरा

आष्टीसह परिसरात विविध ठिकाणी संविधान प्रस्ताविकेचे वाचन

आष्टी(प्रतिनिधी) देशाची एकता आणि एकात्मता कायमपणे अबाधित ठेवणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अमलात आले तो दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज परतूर तालुक्यात आष्टी सह इतर ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला.
आष्टी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने, तसेच संत तुकाराम विद्यालय लिखित पिंपरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमामध्ये आष्टीतील उर्दू व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आष्टी येथे आष्टीचे पोलीस उप निरीक्षक सुभाष सानप यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले संत तुकाराम विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष रामकिशन सोळंके, पत्रकार विष्णू सोळंके, मुख्याध्यापक संजय डोळसे
पी.डी.सोळंके,गंगाधर सुरासे, जनार्धन मस्के, श्री शिंदे,श्री पौळ, श्री.पोटे,बारहाते हे उपस्थित होते.आष्टी येथील कार्यक्रमात हाजी रहेमतखा पठाण,भगवान कांबळे, भागवत कडपे, गौतम शेळके,सत्तार मास्टर, बबलू सातपुते,बाबासाहेब बागल राजेभाऊ आघाव राहुल कांबळे,प्रल्हाद वाहूळे,यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button