आरोग्य व शिक्षणगेवराई

दिव्यांगाच्या २२ विशेष शाळा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

ना.धनंजय मुंडेंकडे विविध मागण्यासाठी शिक्षक भारती विशेष शाळा कर्मचारी संघटनेचे निवेदन

दिव्यांगाच्या २२ विशेष शाळा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
——————–
ना.धनंजय मुंडेंकडे विविध मागण्यासाठी शिक्षक भारती विशेष शाळा कर्मचारी संघटनेचे निवेदन
——————–
गेवराई: बीड जिल्ह्यातील आनुदानित दिव्यांगाच्या २२ विशेष शाळेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याने शाळेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांना शिक्षक भारती विशेष शाळा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बीड जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळे, सचिव अशोक चव्हाण, कार्याध्यक्ष फुलचंद लुुुुचारे, उपाध्यक्ष विक्रम जाधव, सहसचिव सुनिल भोंडवे, कोषाध्यक्ष काकासाहेब थोरवे, सहकोषाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, सह कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कचरे, कार्यालयीन सचिव अतुल लांगोरे यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मागणीपर दिलेल्या निवेदनात संघटनेच्या वतीने असे म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील विशेष शाळांवर दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून २२ आनुदानित दिव्यांगाच्या विशेष शाळेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. ज्या अधिकाऱ्यांमार्फत शाळा तपासणी करण्यात आली त्या अधिकाऱ्यांनी शाळेची कुठलीही सखोल तपासणी न करता जाणीव पुर्वक दिव्यांगाच्या विशेष शाळा बंद करण्याच्या उद्देशाने अहवाल सादर केला. आयुक्तांनी सदरील दिव्यांगांच्या विशेष शाळांना समान ०१ ते ३३ त्रुटी दाखवून सुनावणिच्या नोटीसा दिल्या. सुनावणिच्या वेळी सर्व संस्थांनी हजर राहून सर्व त्रुटींची पुर्तताही केली. परंतू आयुक्तांनी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या आनुदानित २२ विशेष शाळेंचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले. यामुळे दिव्यांगाच्या आनुदानित विशेष शाळेतील सर्व कर्मचारी हावालदिल झाले आहेत. त्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी सदरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करुन नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेल्या आनुदानित शाळा / कार्यशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार व्हावा व नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलेल्या दिव्यांगांच्या आनुदानित विशेष सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांचे दिव्यांग कल्याण आयुक्त स्तरावरुन समायोजन व्हावे. तसेच कर्मचारी समायोजना बाबत जाचक ठरणारे दि. २४/१०/२०१७ चे शासन परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावे. यांसह विविध मागण्यांंचे निवेदन ना.धनंजय मुंडे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळे, उपाध्यक्ष विक्रम जाधव, कार्याध्यक्ष फुलचंद लूचारे, सचिव अशोक चव्हाण, सहसचिव सुनिल भोंडवे, अतुल लांगोरे, रत्नदिप गायकवाड, योगीराज काळे, पाराजी हारे, विजयकुमार झांजे, अशोक माने सह आदि पदाधिकारी उपस्थितीत होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button