गेवराई

गेवराई तालुक्यात वावरणा-या बिबट्याचा बंदोबस्त करा

अमरसिंह पंडित यांची पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे कडे मागणी

गेवराई तालुक्यात वावरणा-या बिबट्याचा बंदोबस्त करा
=========================
अमरसिंह पंडित यांची पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे कडे मागणी
=========================

गेवराई, दि.२६ (प्रतिनिधी) : गेवराई तालुक्याच्या हद्दीत वावरणा-या बिबट्यामुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केली असून त्याबाबत त्यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारीसह इतर अधिकाऱ्यांना यांना पत्र दिले आहे. दिवसा शेतीसाठी उच्च दाबाची वीज उपलब्ध करुन देण्याबरोबर इतर मागण्या केल्या आहेत.

गेवराई तालुक्यातील उमापूर, कुरणपिंप्री, बोरगाव, गुंतेगाव, पाथरवाला, खळेगाव, माटेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्‍वर, सुरळेगाव, कुंभेजळगाव, ब्रम्हगाव, मालेगाव, गुळज, चकलांबा आदी भागांमध्ये बिबट्याचा वावर प्रचंड प्रमाणात वाढला असून त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, महिला आणि लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. या बाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गंभीर दखल घेत त्यांनी ना. धनंजय मुंडे यांना या बाबत पत्र लिहिले आहे. पत्रात ते म्हणतात की, गेवराई तालुक्यातील गोदावरी पट्यात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊसासह इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना रात्री शेतात जावे लागते कारण दिवसभर महावितरणकडून भारनियमन होत असल्यामुळे शेतक-यांना रात्री शेतावर जाण्याची वेळ येते. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरा मध्ये चिंता पसरली आहे, आष्टी तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती गेवराई तालुक्यात होवू नये म्हणून महावितरणने दिवसभराचे भारनियमन रद्द करून कृषी पंपासाठी योग्य दाबाने दिवसभर विद्युत पुरवठा करावा तसेच वनविभागाकडून योग्य ठिकाणी सापळे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी सदर पत्रात केली आहे.

गोदावरी पट्ट्यात शेतकरी व ग्रामस्थांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत असून याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होते माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता यांचेसह इतरांना दिले आहे.

०००

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button