बीडराजकीय

सतीश चव्हाण यांची सोशल मीडिया प्रचारात आघाडी

महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते लागले एकदिलाने कामाला

सतीश चव्हाण यांची सोशल मीडिया प्रचारात आघाड
……………………………………………….
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते लागले एकदिलाने कामाल
—————————————————

बीड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या प्रचारात देखील आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत. त्यामुळे सतीश चव्हाण यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर २०२० रोजी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जोमाने कामाला लागले असून डोअर टू डोअर प्रचार केला जात आहे. तसेच सोशल मीडियावर देखील सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे.

मागील सहा वर्षात केलेल्या उल्लेखणीय कामाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहे. तसेच सतीश चव्हाण यांच्या टीमने व्ही कार्ड तयार केले असून यात एकाच क्लिक वर फेसबुक, व्हाट्सअप, twitter, इन्स्टाग्राम, आदी पेजवर जाता येते. तसेच सतीश चव्हाण यांच्या वतीने भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान च्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा राबवली जाते. त्यामध्ये या आरोग्य सेवेचा लाभ घेतलेल्या रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांचे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या व्हिडीओ क्लिप तयार करून सतीश चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच सतीश चव्हाण यांनी केलेल्या कार्याची कार्य पूर्तता जाहीरनामा, आवाहन पत्र असे सोशल मीडियावर मतदारांना पाठवण्यात आले आहे. तसेच satishchavan.in या वेबसाईटच्या माध्यमातून मतदारांना त्यांचे नाव शोधणे सहज सोपे व शक्य होत आहे. तसेच
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी सतीश चव्हाण यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मराठवाड्यातील महाविकास आघाडीचे सर्वच नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून मराठवाड्यातील आठही जिल्हयात विविध ठिकाणी पदवीधर मेळावे, पदवीधर मतदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. सतीश चव्हाण मागील बारा वर्षांपासून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या कार्यकाळात त्यांनी पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक, सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, सिंचन, कृषी, क्रीडा आदीं क्षेत्रांतील प्रलंबीत प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावली. त्यामुळे येणाऱ्या १ तारखेला होणाऱ्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांना प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button