नोकरी विषयक

राज्यात १२ हजार ५२८ पोलिसांची पदे भरण्याचा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या १६ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात जवळपास साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असून सदरील पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येऊन डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिली आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ वर्षात रिक्त झालेले ५२९७ पदे तसेच २०२० वर्षात रिक्त झालेले ६७२६ पदे आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या एकूण ९७५ पदांपैकी पहिल्या टप्प्यातील पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती आपणास नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button