गेवराई

शेतकऱ्याच्या मुलाची जिद्द; करण मोंढेची भारतीय सैन्य दलात निवड

सुशी (व) येथील पहिला तरुण भारतीय सैन्य दलात; ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा

शेतकऱ्याच्या मुलाची जिद्द; करण मोंढेची भारतीय सैन्य दलात निवड
—————–
सुशी (व) येथील पहिला तरुण भारतीय सैन्य दलात; ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा
—————–
गेवराई: गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव या छोट्याशा गावातील करण तात्यासाहेब मोंढे या शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्य दलात भरती होऊन तरुणांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.देशसेवेसाठी अमोल गवळी यांच्याकडून प्रेरणा मिळाली असून फौजी गणेश बांगर, मेजर चव्हाण , वा.आॅफीसर परदेशी यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे सत्कारास उत्तर देताना करणने यावेळी सांगितले. दरम्यान सुशी येथे ग्रामस्थांकडून कौतुक करत निवडीबद्दल करणचा सत्कार करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या करणला लहानपणापासूनच सैन्य दलात भरती होण्याचे वेड होतं. करण मोंढे याने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुशी, माध्यमिक शिक्षण आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव, तर र.भ.अट्टल महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
शालेय शिक्षण सुरु असतानाच डोक्यात सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याचे ध्येय ठेेवूून भारतीय सैन्य दलात भरती व्हायचं निश्चय करुन करण रोज सकाळी पहाटे चारला उठून आठ ते दहा किलोमीटर धावणे , इतर कसरत , व्यायाम करणे व सैन्य दलात भरती होण्यासाठी जे करता येईल ते नियमित करत असे. शेवटी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करण मोंंढे भारतीय सैन्य दलात भरती झाला. महाराष्ट्रात विविध ठिकाणी सैन्य भरती सुरु झाली कि करण अगदी तयारीने भरती साठी जात असे. एक वेळा करणला अपयश आले होते.परंतु करणने मात्र जिद्द सोडली नाही. कितीहि अपयश आले तर आपण भारतीय सैन्य दलात भरती व्हायचं हे करणने पक्के ठरवले होते. बीड येथे झालेल्या सैन्य भरतीत चांगले प्रयत्न करुन शेवटी दुसऱ्या प्रयत्नात करण सैन्य दलात भरती झाला. मैदानी चाचणी , लेखी परीक्षा व मेडिकल चाचणी मध्ये यशस्वी झाला असून लवकरच तो भारतीय सैन्य दलाकडून ट्रेनिंग साठी हैदराबाद येथे जाणार आहे. आई वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द व चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्य दलात करण यशस्वी झाला आहे. सुशी वडगाव येथील पहिला तरुण भारतीय सैन्य दलात भरती झाल्याने. सैन्य दलात भरती होऊन गावातील तरुणासमोर त्याने वेगळा आदर्श ठेवला आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button