गेवराई

मयत ऊस तोडणी मजूर आदिनाथ सोनवणे परिवाराला आर्थिक मदत मिळवून देणार –अमरसिंह पंडित

उसतोड मजूर सोनवणेच्या परिवाराचे सांत्वन करुन दिला धिर

गेवराई दि. १ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे चकलांबा येथील ऊसतोड मजूर आदिनाथ विक्रम सोनवणे यांचे नुकतेच जेजुरी येथे अपघाती निधन झाले, ते सोमेश्वर कारखाना येथे ऊस तोडणीचे काम करत होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आज सोनवणे परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सोमेश्वर कारखान्याचे प्रशासन व इतर संबंधिताना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून मयताच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

गेवराई तालुक्यातील मौजे चकलांबा येथील ऊसतोड मजूर आदिनाथ विक्रम सोनवणे यांचे नुकतेच जेजुरी येथे अपघाती निधन झाले. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे ते ऊस तोडणीचे काम करत होते. सदर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी सोनवणे परिवाराला धिर दिला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व इतरांशी संपर्क करून विमा व इतर माध्यमातून मयत ऊस तोडणी मजुरांच्या वारसांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु असेही ते यावेळी सांगितले. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, पं. स.सदस्य तय्यब भाई, भागवत खेडकर, ऋषिकेश खेडकर, अंकुश सोनवणे, नारायण जरांगे अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button