केज

सामाजिक क्षेत्राला कै. मधुकरजी (भाऊ) धस यांचा “दिलासा” :- तांबोळी

सामाजिक क्षेत्राला कै. मधुकरजी (भाऊ) धस यांचा “दिलासा” :- तांबोळी
=================================
केज ,(प्रतिनिधी)
दि.०३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात विशेषतः सामाजिक क्षेत्रात बर्यााच ठिकाणी कै. मधुकरजी (भाऊ) धस यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, हे भाऊची चौथी पुण्यतिथी असुन त्यांचं स्मरण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील संस्था व सामाजिक कार्यकर्ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊंना आदरांजली वाहतात. तसेच धारूर येथील धारूर यूथ क्लब च्या रक्त दान शिबीर कार्यक्रमा नंतर भाऊं विषयी बोलत असताना सामाजिक कार्यकर्ते तसेच दिलासा संस्थेच्या ग्राम सेवा प्रकल्पाचे समन्वयक श्री तांबोळी सर व एकनाथ शिंदे म्हणाले की भाऊ म्हणजे एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्रातील समस्त सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना एक मार्गदर्शक तसेच समाज विकासाचा दृष्टीकोण ख-या अर्थाने समजून दिला, भाऊंनी आपले सर्व जीवन समाजाला व माणुसकिला अर्पण केले. भाऊंना सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच गोर गरीब यांची सतत खूप काळजी असायची. तसेच भाऊंनी त्यांच्या उद्धरसाठी बेंबी च्या देठापासून काम केले. आणि तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक छोट्या मोठ्या संस्थांना त्यांच्या विकासासाठी व कामाला गती देण्यासाठी सहाय्य करून एका प्रकारे सामाजिक क्षेत्राला “दिलासाच “दिला आहे. अशा या अविसमरणीय कामामुळे आज भाऊ प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याच्या मनात आदर्श म्हणून जीवंत आहेत. त्यांचा हा वसा आणि वारसा निरंतर सुरू ठेवण्यासाठी आ. श्रीमती विजयताई धस, आदरणीय मनसुरजी खोरसी, आदरणीय सुभाषजी मानकर (दादा) व कोमलताई धस अविरत दिलासा या संस्थेच्या माध्यमातून भाऊंचे स्वप्न पूर्ती करणे साथी क्षेत्रात सक्रियपणे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहेत. शेवटी श्री तांबोळी यांनी बोलताना संगितले की आम्ही भाऊंनी दिलेल्या दृष्टीकोणातून समाज सेवेचे काम यापुढेही निरंतर सुरू ठेवून भाऊंना प्रतेकच्या मनात जीवंत ठेऊ.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button