बीड

नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त 6डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त 6डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बीड – वार्ड क्रमांक 19 चे नगरसेवक माननीय बाळासाहेब गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी 34 वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याकारणाने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाच्या वतीने ही रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे. प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे युवा आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांचे खंदे समर्थक नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे दरवर्षी प्रमाणे भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 10 ते सायं.4 पर्यंत शुक्रवार पेठ येथील गणपती मंदिरात आयोजन केलेले आहे. तरी सर्व मित्र परिवार व रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन बाळासाहेब गुंजाळ मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ बीड, सिंहासनाधीश ग्रुप व पापनेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button