मुंबई

कोविड बाबत सरकारी सूचनांचे पालन करा–जयपाल पाटील

कोविड बाबत सरकारी सूचनांचे पालन करा–जयपाल पाटील

अलिबाग–जीवन अनमोल असून त्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे परम कर्तव्य असून आपल्या कुटुंबाला व आपल्यल्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असून सरकार कडून मिळणाऱ्या प्रत्येक सूचनांचे काटेकोर पालन केले तर कोविड महामारीला आपल्या पासून दूर ठेऊ शकतो असे आवाहन रायगड भूषण, आपत्ती सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील यांनी केले. गोधळपाडा येथील पंच तारांकित हॉटेल रेडिसन च्या प्रशिक्षण विभागाने माझे कुटुंब,माझी जबाबदारी कार्यक्रम च्या व्यासपीठावर जयपाल पाटील,डॉ. सिद्धार्थ पाटील,भारती दीदी,भाषा तज्ञ सुनील प्रधान,प्रशिक्षण व्यवस्थापक ज्ञानेशवर राऊत,पर्सनल अधिकारी अजिक्य पाटील,सुरक्षा अधिकारी, अनिस बर्धन, मानव संधान अधिकारी मुरली कृन्शन, उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षण अधिकारी ज्ञानेशवर राऊत यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले हॉटेल कोविड मूळे वर्षं भर बंद होते आणि आता सरकारी सूचनांचे पालन करून सुरू झाले सुरक्षा रक्षक परिसरातील असल्याने त्याचा साठी रायगड चा युवक फोऊडेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.उपस्थित मान्यवराचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर भाषा तज्ञ सुनील प्रधान यांचे स्वच्यता सुरक्षा, भारती दीदी यांचे मनाची सुरक्षा, डॉ. सिद्धार्थ पाटील यांचे मास्कचा वापर आणि प्रथमोपचार चे ,अपघात प्रसंगी 108 रुग्ण वाहिकेचा वापर कसा करावा हे डॉ. पांडे आतील साधनांचा वापर कसा केला जातो हे पायलट वैभव पाटील यांनी दिले. त्या नंतर कोविड-19महामारीचा संपुर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,रायगडात खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री ना.अदिती तटकरे,सर्व आमदार,जिल्हाधिकारी निधी चोधरी आणि त्याच्या अधिकार क्षेत्रातील महसूल, पोलीस,आरोग्य, जिल्हा परिषद, सर्व पक्षाचे कार्यकर्ते,108 रुग्ण वाहिकेचे अधिकारी, डॉकट्टर,पायलट,कोरोना योद्धे यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख व माहिती दिली सुरक्षा बाबत आपण सुरक्षित राहून इतरांना कशी मदत करून माझे कुटुंब माझी जबाबदारी जयपाल पाटील यांनी विषद केली.या प्रशिक्षण साठी 40 सुरक्षा रक्षक आणि अधिकारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रज्ञा पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रायगडचा युवक फोऊडेशन चे आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे,अंजली दीदी,वैभव पाटील यांनी सहकार्य केले शेवटी आभार सुरक्षा अधिकारी असीमबर्धन यांनी मानले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button