गेवराई

खेर्डा येथे भाजपाला भगदाड

विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची फळी राष्ट्रवादीत दाखल

*खेर्डा येथे भाजपाला भगदाड*
=================
*विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची फळी राष्ट्रवादीत दाखल*
=================
गेवराई दि. ०५ (प्रतिनिधी) भाजपाच्या विद्यमान नेतृत्वाच्या हिटलरशाहीला कंठाळून गेवराई तालुक्यातील खेर्डा बु. येथील भाजपा समर्थक तरुणांनी
माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
जाहीर प्रवेश केला. यावेळी विजयसिंह सिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

भाजपाच्या विद्यमान नेतृत्वाला कंठाळून गेवराई तालुक्यातील आनेक गाव, वाड्या आणि वस्ती वरील भाजपाला भगदाड पडत असून आनेक भाजपा समर्थक माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या सोबत काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होत आहेत. आज रविवार दिनांक ६ रोजी शिवछत्र येथे गेवराई मतदार संघातील खेर्डा बु. येथील सुदर्शन पाटील नाईकवाडे, पप्पू कादे ,लवु देवकुळे, भरत डरपे, रवी चव्हाण यांच्यासह आनेक भाजपा समर्थक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. भाजपाच्या विद्यमान आमदाराने तरुणांचा भ्रमनिरास केला आहे. कोरोनाच्या काळात तालुक्यातील जनतेचा त्यांना विसर पडला. आपल्याच धुंदीत आणि मस्तीत असणाऱ्या या नेतृत्वाला धडा शिकवण्यासाठी आणि शेतकरी, बेरोजगार, युवक यांच्या कल्याणासाठी सदैव झटणाऱ्या माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आम्ही मतदार संघात वाढवू असे ते म्हणाले. विजयसिंह पंडित यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शाम बापू मुळे, सरपंच महादेव नाईकवाडे, बाबासाहेब रडे,
शरद कादे, साईनाथ रडे, बबलू नाईकवाडे, आकाश मसवले, अविनाश जंगले, संदीप मडके आदी पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button