जालनामराठवाडा

आष्टी येथे संभाजी ब्रिगेड या पक्षाची शाखा स्थापना

आष्टी / प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि.6 रोजी संभाजी ब्रिगेड पक्ष शाखा स्थापना कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. या वेळी आष्टी व परिसरातील तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड या पक्षाचे शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी पक्षाची भूमिका मांडत तरुणांना या पक्षात येण्याची साद घातली.यावेळी या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी कैलास खांडेभराड, विजय वाढेकर, ज्ञानेश्वर उढान, सोमेश घारे, बाळासाहेब बरसाले, संदीप वाघमारे, सचिन दरदरे, यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमा दरम्यान सोमनाथ शेळके यांची परतूर तालुकाध्यक्ष पदी तर परमेश्वर लहाने यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला गजानन खुळे, विकास रोहिमल, राहुल तौर, चैतन्य आब्दल, दिपक कदम, निखिल मोरे, आशपाक पटेल, अकाश मोरे उपस्थितीत होते.यांच्यासह तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button