धारूर

धारूर शहरात नकली नोटांचा सुळसुळाट एकास अटक

जिल्ह्यात एकच खळबळ

ईश्वर खामकर (किल्ले धारूर) शहरातील हनुमान  चौकात एका बँक ग्राहक केंद्रावर आज सकाळी पोलिसांनी छापा टाकत नकली नोटांचे रॕकेट उघडकीस आणले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात नकली नोटा आढळून येत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र अधिकृत तक्रार नसल्याने कुठलीही कारवाई होत नव्हती. आज मात्र बाहेरुन आलेल्या पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे हनुमान चौकात एका बँक ग्राहक केंद्र, झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यात २०० रु.च्या नकली नोटां आढळून आल्याची चर्चा असून पोलीसांनी संबधितासह साहित्य ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button