बीड जिल्हा

डिसेंबर महिण्यात नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात 3 टक्के सवलत

 

 

बीड,दि. 09 :-  शासनाने माहे डिसेंबर-2020 पावेतो दस्त नेांदणी केल्यास 3% मुद्रांक शुल्कांत सवलत घेाषीत केलेली आहे या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा यासाठी दस्त ऐवज नेांदणीची सुविधा जिल्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 बीड क्रमांक-1, सह दुय्यम निबंधक वर्ग-2 बीड क्रमांक-2, सह दुय्यम निबंधक वर्ग-2 अंबाजोगाई, सह दुय्यम निबंधक वर्ग-2 माजलगाव, दुय्यम निबंधक श्रेणी-1 परळी, दुय्यम निबंधक श्रेणी-1 केज, दुय्यम निबंधक श्रेणी-1 किल्लेधारुर, दुय्यम निबंधक श्रेणी-1 वडवणी, दुय्यम निबंधक श्रेणी-1 गेवराई, दुय्यम निबंधक श्रेणी-1 आष्टी, दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरुर, दुय्यम निबंधक श्रेणी-1 पाटोदा या कार्यालयामध्ये दिनांक 12 डिसेंबर 2020, दिनांक 19 डिसेंबर 2020 व दिनांक 26 डिसेंबर 2020 या सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येईल. या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अनिल नढे, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button