जालनामराठवाडा

आष्टीत 108 रुग्णवाहिकेचे पत्रकारांच्या हस्ते लोकार्पण

पत्रकार संघाच्या मागणीची आरोग्य मंत्री टोपे यांनी घेतली दखल

आष्टीत 108 रुग्णवाहिकेचे पत्रकारांच्या हस्ते लोकार्पण

पत्रकार संघाच्या मागणीची आरोग्य मंत्री टोपे यांनी घेतली दखल

आष्टी / प्रतिनिधी

परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा व या भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आष्टी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली होती.

मागील महिनाभरापूर्वी आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे परतूर तालुक्यातील आष्टी येथे दौऱ्यावर आले असता यावेळी त्यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.
आष्टी या शहराला जवळपास चाळीस खेड्यांचा संपर्क असून लोकसंखेच्या तुलनेत या भागात ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता आसल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा तसेच येथे एका कायमस्वरूपी निवासी डॉक्टराची नियुक्ती करावी व या भागासाठी 108 रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

आरोग्य मंत्री टोपे यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन आष्टी आरोग्य केंद्रासाठी 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून आष्टी सर्कल मध्ये असलेल्या लोणी,पिंपळी धामणगाव व अकोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉक्टरांची नेमणूक केली असल्याने पालकमंत्री टोपे यांचे नागरिकांतुन मोठ्या प्रमाणावर आभार मानले जात आहेत.

108 या रुग्णवाहिके मुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे सोपे झाले असल्याने रुग्णवाहिकेचे जोरदार स्वागत करण्यात आले व ग्रामीण रुग्णालयाची मागणी अजून अपूर्ण असून या वेळी लागेल तो पाठपुरावा आष्टी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष माऊली सोळंके यांनी यावेळी सांगितले,बळीरामजी कडपे,रमेश सोळंके,यांनीही आपले मनोगत व्यक्त करत हे सर्व श्रेय पत्रकार संघाचे असून, पुढील मागणीसाठी आम्ही आपणास सर्वोत्तपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.यावेळी आष्टीचे सरपंच सादेकभाई,भागवत कडपे, जहागीरदार,वैद्यकीय अधिकारी डॉ.सिद्धार्थ पाईकराव,डॉ.खंदारे, डॉ.मनोज उमरहंडे यांच्यासह आष्टी पत्रकार संघ यांची उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button