बीडबीड जिल्हा

श्री क्षेत्र नारायणगडावर वृक्षारोपण करून खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा

शिवछत्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम --- ह.भ.प.शिवाजी महाराज

बीड दि. १२ ( प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस श्री क्षेत्र नारायणगड येथे शिवछत्र परिवार व शिवशारदा मल्टी स्टेटच्या वतीने वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. वृक्षारोपण सारखा स्तुत्य उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा शिवछत्र परिवाराकडून अविरत सुरू असून हा उपक्रम समाजासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नारायणगड येथे केशर जातीच्या आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले. शिवशरदा मल्टी स्टेट कडून शिवछत्र परिवारातील सर्व सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा उपक्रम मागील वर्षी पासून सुरू आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रावर हे वृक्षारोपण सुरू आहे. शिवछत्र परिवार राबवत असलेल्या या उपक्रमामुळे गडाचा परिसर हिरवागार होणार असून शरदचंद्र पवार यांचा विचार शिवाजीराव (दादा) पंडित परिवाराने सार्थ केला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितितांनी दिली. यावेळी ह.भ.प. धुराजी महाराज, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, गेवराई बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, आप्पासाहेब गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवशारदा मल्टी स्टेट च्या वतीने
शिवछत्र परिवारातील प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाला श्री क्षेत्र नारायणगडावरील दोन एकर जमीन क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात येते. आज शनिवार दिनांक १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक
खा. शरदचंद्रजी पवार यांचा ८० वा वाढदिवस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित आणि शिवशारदा मल्टीस्टेटचे अध्यक्ष जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली श्री क्षेत्र नारायणगड येथे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज, ह.भ.प. धुराजी महाराज, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, गेवराई बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, आप्पासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना ह. भ. प. शिवाजी महाराज यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शिवछत्र परिवाराने वृक्षारोपण करण्यात स्तुत्य उपक्रम घेतला असल्याचे सांगून त्यांनी खा. शरदचंद्र पवार यांना शुभाशीर्वाद दिले.

यावेळी शिवशारदा मल्टीस्टेटचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button