आरोग्य व शिक्षणगेवराईबीड जिल्हा

धोंडराई माध्यमिक विद्यालयातील कु.गिता साखरे हिचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

धोंडराई माध्यमिक विद्यालयातील कु.गिता साखरे हिचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश
——————–
गेवराई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. असून या परिक्षेत धोंडराई माध्यमिक विद्यालयातील कु.साखरे गीता सुंदरराव हिने १६४ गुण मिळवून ती शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. या यशाबद्दल तिचे कौतुक होत असून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.साखरे गीता सुंदरराव हिने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती साठी परिक्षा दिली होती. या शिष्यवृत्ती परिक्षेत १६४ गुण मिळवून ती शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अमरसिंहजी पंडित, जयसिंहजी पंडित, विजयसिंह पंडित, प्रशासकीय अधिकारी गोरकर सर ,अमृत डावकर, मुख्याध्यापक भक्तराज पौळ, शिक्षक बहिरे सर , पाठक सर, काकडे सर, शेंबडे सर, काझी सर, फरतारे सर, खोजे सर, पिसाळ सर, भरतदादा खरात, नारायण नवले, मच्छिंद्र खरात, पोपटसिंग राजपुत, भास्करराव खरात, किरण खरात, राहुल खरात, रमेश साखरे, भाऊसाहेब निकम, रवि ढेंबरे, दिपक खरात, अशोक नरोटे, फारुक इनामदार, संतोष जाधव, शिवाजीराव भोसले, सचिन खरात, भिमराव प्रधान सह आदिंनी अभिनंदन केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button