बीडबीड जिल्हा

एन.ए.आदेश बोगस आहे का ? हे पाहून प्लॉट खरेदी करा- अँड. अजित देशमुख

एन.ए.आदेश बोगस आहे का ? हे पाहून प्लॉट खरेदी करा- अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) सध्या अकृषी आदेश लावून खरेदीखते नोंदले जात आहेत. खरेदी घेणाऱ्यांची यात मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी आणि महसूल खात्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना या बाबी माहीत आहेत. बोगसगिरी थांबण्यासाठी ते पुढे येत नाहीत. त्यामुळे अकृषी आदेश खरा आहे का ? याची खात्री करूनच प्लॉट खरेदी करावेत. जनतेने दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड अजित देशमुख यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील बोगस अकृषी आदेशांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गंभीर दखल घेतलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सर्व तालुक्यातील तहसील कार्यालये कामाला लागले असून आणखी अन्य कार्यालय देखील कामाला लागले आहेत.

कोणते अकृषी आदेश खरे आणि बोगस कोणते ? हे येत्या काही दिवसात उघडकीस येणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये प्लॉटिंग खरेदी-विक्री करणाऱ्या बदलांमध्ये खळबळ माजली आहे. लोकांमध्ये जागृती निर्माण झाली असून यामुळे लोकांचे हित साधले जात आहे.

पारदर्षक कारभार करणे, हा जन आंदोलनाचा उद्देश असून यामुळे दलालांची गळचेपी होत असल्याने प्लॉट खरेदी विक्री सध्या कमी आहे. सर्वसाधारण व्यक्ती प्लॉट खरेदी करताना एक – एक रुपयांची बचत करून काबाड कष्ट करून पैसा जमा करतो. मात्र हे प्लॉट खरेदी करताना कागदपत्र परिपूर्ण आणि खरी आहेत का ? याची पडताळणी शिकलेले लोक देखील करत नाहीत. या बाबी उघडकीस आल्या आहेत.

याला विक्रेता जेवढा काढणारा असतो. त्यापेक्षा दहापट दलाल कारणीभूत असतात. आणि या दलालांना ठेचून काढण्याची हीच एक संधी आहे. अशा रितीने दलाल दहा आणि पंधरा फुटाची रस्ते सोडून प्लॉट विकतात. एका एका प्लॉटच्या अनेक वेळेस रजिस्ट्री झाल्याने एका जागेचे दोन-दोन, तिन-तिन. मालक होतात. त्यामुळे वाद वाढत असतात. हे थांबवायचे असेल तर प्रत्येक फ्लॅट खरेदी करणे करणाऱ्याने अकृषी आदेश खरा आहे का ? याची चौकशी करावी.

कागद पत्र पाहूनच खरेदी करावी. फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button