बीडबीड जिल्हा

ग्रामपंचायत निवडणुका खुल्या वातावरणात पार पाडाव्यात-जिल्हाधिकारी राहूल रेखावार

बीड, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता अमलात आलेली आहे.निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्हयातील 129 ग्रामपंचायतीसाठी दि. 15 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी दि. 18 जानेवारी 2021 सोमवार रोजी होणार आहे. ठिकाण व वेळ निश्चित करण्यात येणार असून निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि. 21 जानेवारी 2021 गुरुवार रोजी प्रसिध्द करण्यात येतील. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न उदभवू नये यासाठी निवडणुका व मतमोजणी खुल्या वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित होणा-या 129 ग्रामपंचयातीच्या सार्वत्रिक निवडणूकाकरिता संगणकीकृत पदध्तीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिला असून संगणकीकृत पध्दतीने कार्यक्रम राबवावा यासाठी सर्व संबधितांना निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार

कायद्याच्या वरील तरतुदी लक्षात घेता निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दुष्टीने लोकसभा निवडणूकांच्या वेळी ज्या प्रमाणे कार्यवाही केली जाते त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या वेळी सर्व आवश्यक बाबींवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या इमारती गळणार नाहीत व मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदान पथकास कुठल्याही कारणामुळे अडचण येणार नाही याची खबरदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद बीड व संबंधित बांधकाम विभाग जि.प. बीड यांची राहील. मतदान केंद्र व मतमोजणीच्या वेळी पुरेसा बंदोबस्त पुरविणे व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक यांची आहे. निवडणूक असलेल्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणी पथकाची स्थापना, तालुक्यातील आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाची स्थापना तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दैनंदीन अहवाल पाठविणे ही संबंधित तहसीलदार यांची आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाशिवाय मातमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी अधिक्षक अभियंता बीड यांनी घ्यावी. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दारु विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील याची काळजी अधिक्षक .राज्य उत्पादन शुल्क बीड यांनी घ्यावी. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांची राहील. निवडणूक लढवणा-या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरल्यापासून होणा-या दैनिक खर्चाची माहिती संबंधित तहसील कार्यालयातील खर्च तपासणा-या पथकास सादर करणे जरुरीचे आहे. तसेच मतमोजणी संपल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या आत खर्चाचा विहित शपथपत्रासहित सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवार यांची आहे. तसेच मुदतीत खर्च सादर न केल्यास त्या उमेदवारांना निरर्ह करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांची राहील. या निवडणूका पार पाडताना कोविड 19 च्या अनुषंगाने परिस्थितीत घ्यावयाची योग्य काळजी, खबरदारी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांची राहील.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button