गेवराईबीड जिल्हा

शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी ॲपचा वापर करावा- तलाठी धारुरकर

सुशी येथे ई- पीक पाहणी ॲपचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

गेवराई: पीक पेरणीची नोंद दरवर्षी करत असताना अनेक वेळा मनुष्यबळाच्या अभावी योग्य पद्धतीने पेरा नोंदणीमध्ये अडचण येऊ शकते , ही पिक पेऱ्यांची नोंद शेतक – यांना व्यवस्थित पद्धतीने करता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन ई – पीक पाहणी ॲप श निर्माण केले असून या वर शेतकर्यांनी आपल्या पीक कार्याची नोंदणी करण्यासाठी ई-पिक पाहणी अॅपचा वापरा करावा असे आवाहन सुशी वडगाव सज्जाचे तलाठी धारुरकर आर.पी यांनी सुशी वडगाव येथे शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी ॲपची माहिती देताना केले आहे.
गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथे मंगळवार दि.२२ डिसेंबर रोजी तलाठी धारुरकर आर.पी यांनी ई- पीक पाहणी ॲपचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले यावेळी ते बोलत होते.दरवर्षी खरिप , रब्बी , उन्हाळी हंगामात शेतात पेरणी केलेल्या पिकाची नोंद पिक पेरा म्हणून ७/१२ वर घेतली जाते. सदरचे काम यापूर्वी तलाठी यांनी प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतात जाऊन कोणते पीक संबंधित शेतकरी यांनी पेरणी केले आहे , ते प्रत्यक्ष पिक पाहणी करुन त्याची नोंद केली जाते.एखाद्या गावाचे शिवार क्षेत्र मोठे असले तर त्याची पाहणी करणे तलाठ्यांना शक्य होत नव्हते. सदर पीक पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी अँप आणले असुन त्यानुसार स्वतःशेतकर्यांनी आपल्या शेतात कोणते पिके पेरली आहेत. याविषयी माहिती भरायची आहे. तसेच शेतातील पिकाचे फोटो अपलोड करायचे आहेत .त्यावर पिक पेरणी दिनांक , जलसिंचनाचे साधने , इत्यादी माहिती नमूद करुन सदर अँपवर आँपलोड करायची आहे . एका अन्ड्राईड मोबाईल नंबर वरून जास्तीत जास्त २० शेतकरी ही माहिती अपलोड करू शकतील. यासाठी बीड जिल्हाची प्रायोगिक तत्वावर निवड केली आहे . त्या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात सदर अँपची माहिती देण्यासाठी महसूल तलाठी व मंडळ अधिकारी व कृषीचे कृषी सहायक व कृषी मंडळ अधिकारी नेमून दिलेल्या गावात प्रशिक्षण देण्याच काम करत आहेत. त्यासाठी लिंकचा वापर करून सध्या प्रशिक्षण गावातील शेतकरयांना देण्याच काम सुरू आहे. त्याअनुषंगाने दि.२२ डिसेंबर मंगळवार रोजी सुशी , वडगाव,चिखली येथे सदर अँपचे शेतक – यांना सुशी वडगाव सज्जाचे तलाठी धारुरकर यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button