बीडबीड जिल्हा

विक्री योग्य कापूस नोंदणी 4 जानेवारी पर्यंत करता येणार

विक्री योग्य कापूस नोंदणी 4 जानेवारी पर्यंत करता येणार

बीड,बीड जिल्हयात कापूस खरेदी हंगाम सन 2020-21 मध्ये शासकीय हमीभावानुसार कापूस खरेदी सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्यामार्फत चालू आहे बीड तालुक्यामध्ये सीसीआयची 11 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर गेवराई येथील 7 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर व वडवणी येथील 2 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू आहे. या तीन तालुक्यात दि. 21 डिसेंबर 2020 अखेर एकूण 2,43,594 क्किंटल कापूस खरेदी झालेली आहे तसेच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महसंघामार्फत माजलगाव तालुक्यात 4 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर परळी तालुक्यात 1 जिनिंगवर केज तालुक्यात 4, धारुर तालुक्यात 6 अशी एकूण 15 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू असून दि. 21 डिसेंबर 2020 अखेर या चार तालुक्यात एकूण 2,64,071 क्किंटल कापूस खरेदी झलेली आहे जिल्ह्यामध्ये व्यापा-याकडून 1,42,177 क्किंटल कापूस खरेदी झालेली असून जिल्ह्यामध्ये सीसीआय,महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व खाजगी खरेदी अशी एकूण 6,49,842 क्किंटल कापूस खरेदी झलेली आहे.
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची परळी तालुक्यात 4, माजलगाव तालुक्यात 5,केज तालुक्यात 1 व आष्टी तालुक्यात 1 अशा एकूण 11 कापूस खरेदी केंद्राना नव्याने मुजूरी मिळालेली आहे. नव्याने सुरु होणा-या 11 कापूस खरेदी केंद्रावर जिल्हाधिकारी,बीड यांच्या दि. 21 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये 16 ग्रेडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये दि. 19 डिसेंबर 2020 अखेर 66746 शेतक-यांनी त्यांचा कापूस शासकीय हमी भावानुसार विक्री करण्यासाठी संबंधित बाजार समित्यांक्डे आवश्यक कागदपत्रासह नोंदणी केली आहे. परंतु जिल्हयातील ब-याच कापूस उत्पादक शेतक-याकडून व लोकप्रतिनिधीकडून कापूस नोंदणीसाठी मूदत वाढवून देण्यात मागणी करण्यात येत आहे.
जिल्हयातील बाजार समित्यामध्ये शेतक-यानां त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंद करण्याची मुदत दि. 4 जानेवारी 2021 अखेर वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या कापूस उत्पादक शेतक-यांची अद्याप बाजार समितीकडे नोंद केलेली नाही त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या वाढीव कालावधीत त्यांच्याकडील विक्रीयोग्य कापसाची आपल्या तालुक्याच्या बाजार समितीकडे केलेली नाही, अशा सर्व शेतक-यांनी दि. 4 जानेवारी 2021 पर्यंत त्यांचा पासपोर्ट साईझचा फोटो,आधार कार्ड, जनधन खाते वगळून इतर राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या बचत खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत,कापूस पीकाची नोंद असलेला गाव नमूना क्र. 7/12 ची प्रत आणि तलाठी यांचे स्वाक्षरी व शिक्क्यासह पीक पेरा प्रमाणपत्र यासह आपल्या बाजार समितीकडे नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक संस्था बीड यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button