महाराष्ट्रराजकीय

अकोला महानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष पदी विजय देशमुख यांची नियुक्ती.

अकोला महानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष पदी विजय देशमुख यांची नियुक्ती.

अकोला ३०, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष जल संपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोला महानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष पदी झुंजार कार्यकर्ते विजय देशमुख यांची नियुक्ती केली आहे , महानगर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्याध्यक्ष पदी सय्यद युसुफ अली यांची नियुक्ती केली आहे , तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश संघटक सचिव पदी कृष्णा अंधारे यांची नियुक्ती केली आहे ,. विजय देशमुख या पूर्वी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण चे अध्यक्ष होते त्यांना अकोला पश्चिम विधान सभा मतदार संघातून पक्षाने उमेदवारी दिली होती परंतु त्यामध्ये त्यांचा भाजपा चे आमदार गोवर्धन शर्मा यांनी पराभव केला होता , या पूर्वी चे अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष राजू मुल चंदानी यांना पद मुक्त करून त्यांचे जागेवर विजय देशमुख यांची नियुक्त करण्यात आले आहे , १ वर्षानंतर होणाऱ्या अकोला महानगर पालिकेच्या निवडणुकी चे पार्श्वभूमी वर पक्षाने ह्या नियुक्त्या केल्या आहेत , नवनियुक्त अध्यक्ष विजय देशमुख , कार्याध्यक्ष सै.युसुफ अली , प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे या पाधिकार्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे ,

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button