आरोग्य व शिक्षणबीडबीड जिल्हा

के एस के हॉस्पिटल मध्ये सात दिवसीय स्त्रीरोग मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

के एस के हॉस्पिटल मध्ये सात दिवसीय स्त्रीरोग मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

बीड-सौ. केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटल येथे सात दिवसीय मोफत स्त्री रोग आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा.असे आवाहन स्त्री रोग तज्ञ डॉ सारिका क्षीरसागर यांनी केले आहे

दि.04 जानेवारी ते 10 जानेवारी 2021 वेळ : दररोज स.10 ते दु.4 या दरम्यान सौ केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटल येथे सात दिवसीय स्त्रीरोग मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ यांच्या मार्फत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे आजाराचे निदान झाल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत या शिबिरात एक आठवडाभर मोफत तपासणी होणार असून यामध्ये वंध्यत्व उपचार, श्वेतप्रदर, गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार, गर्भाशयाच्या पिशवीचे आजार,मासिक पाळीच्या समस्या, बिनटाक्याच्या गर्भपिशवीचे ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे तपासणी व शस्त्रक्रिया असे या आरोग्य शिबिराची वैशिष्ट्ये आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान स्त्री रोग व उपचार तज्ञ डॉ सारिका क्षीरसागर यांनी केले आहे सदरील शिबिरात नावनोंदणी करण्यासाठी 7888129555 व 7057311010 या क्रमांकावर संपर्क साधावा

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button