गेवराईबीड जिल्हा

गेवराईच्या राष्ट्रवादीत ईनकमिंग सुरुच

विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत मुळुकवाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

  1. गेवराई :- गेवराई विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांची ईनकमिंग सुरुच असून मौजे मुळुकवाडी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवार दि. ०३ जानेवारी रोजी माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी विजयसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले.

गेवराई तालुक्यातील मौजे मुळुकवाडी येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक बयाजी जाधव, संदीपान वाघ, परमेश्वर वाघ, बापूराव साबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार घराघरात पोंहोचविण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. विजयसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी महादेव पवार, गणेश साबळे, धोंडीराम पौळ, चंद्रभान कोकाटे, तुकाराम पवार, बबन कोकाटे, संभाजी साबळे, कैलास पौळ, केरबा पवार, लक्ष्मण पवार, बाळू पवार, अविनाश वदक, मोतीराम कोकाटे, शंकर वाघ, संजय साबळे, अशोक वदक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button