पाटोदाबीड जिल्हा

शेतकऱ्यांचा आसूड पुरस्काराने अँड. अजित देशमुख सन्मानीत

कार्यक्रमास खासदार आमदारांची उपस्थिती

पाटोदा( प्रतिनिधी ) जागर मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा “शेतकऱ्यांचा आसूड” हा पुरस्कार यंदा भ्रष्टाचार विरोधी चळवळीत सातत्याने कार्यरत असणारे अँड. अजित देशमुख यांना सन्मान पूर्वक बहाल करण्यात आला.

जागर तर्फे प्रतिवर्षी शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा पुरस्कार देण्यात येतो. अँड. अजित देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांना दोन पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कॉम्रेड काशिनाथराव जाधव गौरव पुरस्कार प्राध्यापक शांताबाई जाधवर यांना तर सावित्रीबाई फुले समता ज्योती पुरस्कार शुभांगी कुलकर्णी यांना देण्यात आला.

कार्यक्रमास माजी आमदार उषा दराडे, संपादक सुनील शिरसागर, विष्णुपंत घोलप, शिव भूषण जाधव, एडवोकेट जब्बार पटेल, महादेव नागरगोजे, राजाभाऊ देशमुख, इम्रान हाश्मी, भास्कर पाटील, प्राध्यापक सय्यद नुसरत इक्बाल, राज घुमरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक एकबाल पेंटर यांनी या पुरस्कारासाठी या मान्यवर यांची निवड का केली ? याविषयी भूमिका स्पष्ट केली. तसेच अन्य विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी असे सूत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले.

पुरस्कार प्राप्त सर्वांचे खासदार फौजिया खान, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार उषा दराडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले. जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये या शाळेच्या मुलींनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आपली भूमिका मांडली.

या कार्यक्रमात इकबाल पेंटर यांच्या कामावर देखील अनेकांनी प्रकाश टाकला. सामाजिक काम करत असताना या कार्यकर्त्यांना स्वतःचा कोणताही हेतू नसतो. हे लोक समाजासाठी सातत्याने जगत असतात, असे खासदार फौजिया खान यांनी म्हटले. तर हेच कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने झगडत असतात. या झगडण्या पाठीमागे त्यांचा शुद्ध हेतू असल्याने जनतेचे प्रश्न देखील मार्गी लागत असतात. अशा कार्यकर्त्यांमुळे सामाजिक चळवळी जिवंत असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी म्हंटले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button