गेवराईबीड जिल्हाराजकीय

वंजारवाडी शिराळ्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत भाजपा -सेना कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

गेवराई :-गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाला कंठाळून आनेक गावातून शेकडो कार्यकर्ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची ताकद मोठ्याप्रमाणावर वाढली आहे.

गेवराई विधानसभा मतदार संघात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत ईनकमिंग सुरुच असून मौजे वंजारवाडी येथील भाजपा-शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते गणेश चोरमले, राहुल पवार, विठ्ठल भांडवले, बाबुराव तारगे, जालिंदर पवार, शिवाजी गोकुळे आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपा-शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी बाबुराव पवार, दौलत दाभाडे, अशोक माटेकर, सूर्यकांत पवार, निलेश दाभाडे आदी उपस्थित होते.

शिराळा येथील भाजपा-शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते अप्पासाहेब तेलुरे, अप्पा नाना तेलुरे, शिवाजी तेलुरे, शेषेराव तेलुरे, हरिभाऊ तेलुरे, भगवान तेलुरे, रमभाई शेख, लतीफ भाई, कालुभाई, सोजरभाई, प्रल्हाद तेलुरे, इसाभाई, शहाजान भाई, सोमनाथ तेलुरे, राजाभाऊ तेलुरे, शेख वाहेद, महेश तेलुरे, अमोल तेलुरे, राहुल तेलुरे, सातीराम तेलुरे, सोहेल शेख, हरून शेख, महादेव शिंदे, गोरख शिंदे आदींसह शेकडो भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा-शिवसेनेचा त्याग करून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सभापती कुमारराव ढाकणे, बाळासाहेब राऊत, श्रीराम आरगडे, मोहनराव घाटुळ, शेख जमीर, शेख जलील, सालारभाई आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button