बीडबीड जिल्हा

सिध्दीविनायक अर्बनचा माजी आ.अमरसिंह पंडितांच्या हस्ते उद्घाटन शुभारंभ संपन्न

गेवराई: सिध्दीविनायक अर्बन मल्टीपल निधी लि.बीड चा भव्य उद्घाटन शुभारंभ दि.१ जानेवारी शुक्रवार रोजी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी संत महंतासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ‌.प. शिवाजी महाराज नारायणगडकर, ह.भ.प महादेव महाराज चाकरवाडीकर, ह.भ.प दत्ता महाराज गिरी, यांच्यासह यावेळी शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित, अॅड.महादेव तुपे, भरतदादा खरात, संपादक अजित वरपे, महेश वाघमारे,माजी उपसभापती भिष्माचार्य दाभाडे, शेख तय्यबभाई, हिंमतराव खरात, अभय जोशी, संजय तळतकर, साईनाथ परभणे, राजेश करांडे,अमृत डावकर, मनोहर गिरी, विलास देवकाते, माजी सभापती अभिजित पंडित,पत्रकार सतिश जोशी, दिनेश लिंबेकर, विनोद पौळ, भागवत जाधव, मंगेश चोरमले, प्रा.धर्मराज पौळ, चंद्रकांत पौळ,महोन ठाकर, राजेंद्र जाधव, डॉ.अशोक यादव, अर्जुन फरतारे, दादाभाऊ घुगे, सुरेश भोसले, विशाल साळुंखे, नंदकुमार पौळ, तिर्थराज पौळ, चंदु पौळ, बप्पा मोंढे,शेख अल्ताफ, बबनराव औटे, वशिष्ट काळे, अजित काळे, विक्रम कदम, गहिनीनाथ शिंदे, विष्णू ठोसर, महादेव करांडे, हिंमत भोसले, सुधीर माने, आण्णासाहेब चव्हाण, सुभाष आडे, दिनकर आडे, विठ्ठल घुगे, संतोष ठोसर, यांच्या सह आदि मान्यवर व मित्रपरिवार शुभचिंतक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे सिध्दीविनायक अर्बनचे चेअरमन तथा पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, व्यवस्थापक रोकडे यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button