गेवराईबीड जिल्हा

समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी दक्ष पत्रकार सदैव तत्पर – महंंत दत्ता महाराज गिरी

गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचा दर्पणदिन उत्साहात साजरा

गेवराई :-समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघ हा सदैव तत्पर असून त्यांचे कार्य सामाजिक कौतुकास्पद असल्याचे मत श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता महाराज गिरी यांनी व्यक्त केले‌.
गेवराई शहरातील सिंधी भवन याठिकाणी बुधवारी गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्ता महाराज गिरी हे बोलत होते. दरम्यान दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करुन पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत ह.भ.प.दत्ता महाराज गिरी तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब मस्के, पंचायत समितीचे सभापती दिपक सुरवसे, गेवराईचे माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, अँड.सुभाष निकम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, अँड.गणेश कोल्हे, महेश बेदरे, रेवकी अर्बनचे चेअरमन विलास देवकते, युवा नेते दत्ता जाधव, युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब घोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब मस्के, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, गेवराईचे माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, अँड.सुभाष निकम, अँड.गणेश कोल्हे आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.यानंतर ज्येष्ठ पत्रकारांचा संन्मान, दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, सचिव सुनील मुंडे, उपाध्यक्ष विष्णू गायकवाड, कार्याध्यक्ष विनोद पौळ, कोषाध्यक्ष मंगेश चोरमले, सदस्य तुकाराम धस, ज्ञानेश्वर हवाले, अमीन शेख, श्रीराम बारहाते, संतराम जोगदंड, शाम जाधव, कामराज चाळक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार सुनील मुंडे तर आभार विनोद पौळ यांनी मानले.

———–

ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
दक्ष पत्रकार संघाच्या वतीने यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. गेवराईतील पहिले पत्रकार काझी हयातुल्ला तसेच काझी अमान, पाचपुते, रुकर तसेच ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते जयकुमार देशपांडे, अर्जुनराव बेदरे आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पाचपुते यांनी सत्कारमुर्तींच्या वतीने आभार व्यक्त केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button