बीडबीड जिल्हा

‘सकाळ’चे दत्ता देशमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व मराठवाडा साथीचा राज्यस्तरीय पुरस्कार

‘सकाळ’चे दत्ता देशमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व मराठवाडा साथीचा राज्यस्तरीय पुरस्कार

बीड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणार्‍या सकारात्मक लेखनासाठीच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ‘सकाळ’चे बीड येथील जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांची निवड झाली.दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.सहा) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. औरंगाबाद येथे लवकरच पुरस्कार वितरण होणार आहे.
दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार देण्यात येत आहेत.प्रथम राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ‘सकाळ’चे बीड जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांच्या सकारात्मक लेखनाची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे व पत्रकार दत्तात्रय काळे यांनी पुरस्कारांची घोषणा करुन पुरस्कारर्थींचे अभिनंदन केले. मागच्या 18 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असलेल्या दत्ता देशमुख यांनी आपल्या लेखणीतून जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, शैक्षणिक, विकासात्मक, प्रशासकीय, शेती, महिला, सहकार, आरोग्य अशा क्षेत्रांबाबत लिखान केले. सकारात्मक लिखानातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. तसेच प्रशासकीय क्षेत्रातील अनेक अनियमितता त्यांनी पुढे आणल्या. या काळात त्यांना ‘सकाळ’तर्फे दिला जाणारा सकाळचे संस्थापक संपादक ना. भी. परुळेकर पुरस्कार, केज तालुका आदर्श पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार, कै.त्र्यंबक आसरडोहकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार, अंबाजोगाई, राधाकिसन परदेशी स्मृती पत्रकार पुरस्कार, निर्भिड पत्रकार संघाचा जिजाऊरत्न पत्रकारिता पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद पत्रकारिता पुरस्कारांसह चार वेळा ‘सकाळ’ एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button