पाटोदाबीड जिल्हा

क्रांतिज्योती सावित्रिबाई मुळेच आज महिला यशोशिखरावर पोंहोचल्या प्राचार्य डॉ. सय्यद

जयभवानी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जंयती साजरी

पाटोदा :-क्रांतिज्योती सावित्रिबाई मुळेच आज महिला यशोशिखरावर पोंहोचल्या असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सय्यद एस. आर . यांनी केले. दिनांक ३ जानेवारी रोजी पाटोदा येथील जयभवानी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जंयती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सय्यद एस .आर. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पाटोदा नगरपंचायतच्या स्वछता अभियानाचे सुनिल शिंदे , प्रधान साहेब , श्रीमती पुजा मॅडम, श्रीमती शिंदे मॅडम , गौतम सर , प्रा .डॉ . रामकृष्ण प्रधान हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . या प्रसंगी पाटोदा नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाचे समन्वयक सुनिल शिंदे यांनी स्वच्छतेचे महत्व व गरज या विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले, नतंर हरित शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतीक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते . कार्यक्रमाचे संचलन कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बंडू लोखंडे यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रधान साहेब यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button