केजबीड जिल्हा

केजच्या लाचखोर तलाठ्याच्या सभ्यपणाचा बुरखा एसीबीने टर्रटरा फाडला..

पन्नास हजाराची लाच घेताना तलाठ्यायासह सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात.!

केज,( प्रतिनिधी)एकीकडे आपण ऑनलाईन पध्दतीमुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे. असे मानतो मग हा भ्रष्टाचार नव्हे तर काय आहे ? र्सव सामान्य जनतेच्या कामासाठी प्रशासकिय यंत्रणा नेमण्यात आली आहे. नाममात्र शुल्कात जनतेची कामे व्हावीत म्हणून सर्वत्र डांगोरा पिटला जातो. परंतु या सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी लाखो रूपयांची मागणी केली जाते. म्हणून अशा घटना वारंवार रोज कुठेना कुठे घडत आहेत.हि लाचखोर मंडळी एवढ्या प्रमाणात लाच मागण्याचे धाडस करतेच कसे हि अश्यर्याचीच बाब आहे.

या बाबत प्राप्त माहिती नुसार केज तहसिलच्या केज महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या व मुळ टाकळी सज्जासह अतिरिक्त चिंचोलीमाळी सज्जावर कार्यरत असणाऱ्या तलाठी महाशय व त्यांचा सहकारी याला केज तहसिलच्या आवारात ५० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ ऊडाली आहे.
संपादित जमिनीचे क्षेत्र कमी दाखवण्यासाठी  १ लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह सहाय्यकाला ‛एसीबी’च्या पथकाने केज येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या (अनाधिकृत) कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पकडले .
या तलाठी महाशयाचे नाव दयानंद शेटे तर सचिन घुले असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे.
या तलाठ्याने तक्रारदाराकडून पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून ५० हजार रुपये स्वीकारताना ‛एसीबी’च्या पथकाने त्याला रंगेहात पकडुन त्याच्या सभ्यपणाचा जणु बुरखाच टर्रटरा ..फाडुन खरा लाचखोर चेहरा जनतेसमोर आणला आहे. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केज पोलीस स्टेशनमध्ये उशीरापर्यंत सुरू होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button