गेवराईबीड जिल्हा

विकासाचा समतोल राखण्यासाठी ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या—विजयसिंह पंडित

विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत मुळुकवाडीचे भाजपा -सेना कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

गेवराई -(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मुळुकवाडी पांढरवाडी टाकळगव्हाण आदी गावांचा दौरा करुन आपल्या गावाच्या समतोल विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पँनलचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करुन ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या असे आवाहन केले. यावेळी मुळुकवाडीच्या भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. विजयसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी नगरसेवक शाम येवले, दिपक आतकरे, दत्ता दाभाडे, संदीप मडके, भाऊसाहेब माखले, दिलीप पानखडे, राजु शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विजयसिंह पंडित पूढे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासाला कणा असणारी जिल्हा परिषद आपल्या विचाराची आहे, तसेच राज्यात आपली सत्ता आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे असणारे ग्राम विकास खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. हा आपला काळ आहे. श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा यापूर्वीही प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करू असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यावर जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपल्या गावाच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात मुळुकवाडी येथील भाजपा-शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते अर्जुन वाघ, बापुराव गोरे, उद्वव कोकाटे, बळीराम कोकाटे, मधुकर कोकाटे, राम सावंत, दादासाहेब नरवडे, लहानु वदक, गंगाराम कोकाटे
आदी कार्यकर्त्यांनी विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी टाकळगव्हाण येथील भागवत काकडे, भगवान काकडे, जगन्नाथ काकडे, जुगल काकडे, बापुसाहेब महाडिक ,सचिन गचांडे, शिवाजी आडागळे, विजय काकडे, विलास महाडिक, शहाजी मोरे, राहुल मोरे, भगवान मोरे, सुनिल मोरे, विष्णु काकडे, शाम काकडे, किसन काकडे, उद्धव काकडे, अनिल काकडे, लक्ष्मण महाडिक तर मुळुकवाडीचे संजय साबळे, बयाजी जाधव, महादेव पवार, बबन कोकाटे, काशिनाथ सपकाळ, बबन पवार, काशिनाथ वाघ, केरबा पवार, अशोक वदक, विकास वदक, दादासाहेब नरवडे, तुळशिराम वदक, लहुराव साबळे, ज्ञानेश्वर साबळे, अंकुश साबळे, किसन वाघ आणि पांढरवाडीचे आसाराम टकले, वैजिनाथ टकले, महमंद यासिन, जगदिश मराठे, राजेंद्र मोळे, महंमद शब्बीर, अशोक टकले, आत्माराम भिताडे, बप्पासाहेब भिताडे, शेख मुस्तफा, महंमद रवुफ, राजेंद्र टकले,बाबुराव जाधव, महादेव जाधव आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button