बीडबीड जिल्हा

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बीड च्या 100 कोटी ठेवी पुर्ण 200 कोटी ठेवी कडे यशस्वी वाटचाल

बीड:-परभणे इस्टेट, माळीवेस बीड येथे श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट लि,. बीड या संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष मा. श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब यांनी 19 एप्रिल 2013 रोजी केली या संस्थेचे कामकाज प्रत्यक्षात सुरुवात झाले आज संस्था स्थापन होऊन 8 वर्ष पूर्ण होत आहेत आज संस्थेच्या एकूण 20 शाखा कार्यरत असून संस्थेचे 5 जिल्ह्यांमध्ये शाखेच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. आज संस्थेचे एकूण 100 कोटी ठेवी पूर्ण होऊन 200 कोटी ठेवी कडे यशस्वी वाटचाल करत आहोत यामध्ये संस्थेच्या सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, मित्रपरिवार व सर्व संचालक मंडळ,सर्व अधिकारी वृंद,सर्व कर्मचारी वृंद, सर्व पिग्मी प्रतिनिधी वरील सर्वाचा मोलाचा वाटा आहे या सर्वांचे खूप खूप अभिनंदन तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाहिनाथ परभणे साहेब यांचेही खूप खूप अभिनंदन !

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button