बीडबीड जिल्हा

प्रशांत डावकर यांचे दुःखद निधन

अनेकांनी सांत्वन करून वाहिली श्रद्धांजली

बीड (प्रतिनिधी) : विधी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक प्रशांत भीमराव डावकर यांचे बुधवार दि. १३ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय ४८ वर्षे होते. त्यांच्या पश्चात आई, मुलगी, मुलगा व पत्नी असा परिवार आहे. प्रशांत डावकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

विधी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक प्रशांत डावकर यांचे बुधवार दि. १३ जानेवारी रोजी दुपारी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४८ वर्षे होते, घरी जेवण करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, अत्यंत सुस्वभावी म्हणून ते परिचित होते.

प्रशांत डावकर यांच्या वडिलांचे व मोठ्या भावाचे यापूर्वी निधन होते, त्यांच्या पश्चात त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जवाबदारीने काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मोंढा रोड येथील अमरधाम येथे पार पडला, यावेळी उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचा राख सवडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी ८.३०. वाजता होणार आहे. डावकर परिवारावर मोठे दुःख कोसळले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button