बीडबीड जिल्हा

मतदान शांततेत आणि जास्तीत जास्त प्रमाणात करा अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) आज गुरुवारी ग्रामपंचायतचे मतदान होत आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रात यावे आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे. त्याच प्रमाणे मतदानाच्या ठिकाणी गुंडागर्दी न करता सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि पॅनल प्रमुखांनी शांततेत मतदान होऊ द्यावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

आज बीड जिल्ह्यात ग्राम पंचायतींसाठीचे मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी जेवढी वाढेल, तेवढा लोकशाहीचा पाया मजबूत होत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी स्वतःहून मतदान केंद्रावर जावे आणि मत टाकावे.

त्याचबरोबर मतदान केंद्रावर कुठलीही गुंडागर्दी होणार नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी गुंडगिरी होण्याचा प्रकार दिसत असेल त्या ठिकाणी पोलिसांनी दंडुक्याचा वापर करून त्या लोकांवर दबाव आणावा आणि शांततेत मतदान पार पडण्यासाठी सहकार्य करावे.

गावाच्या विकासासाठी चांगले लोक निवडून यावेत. ज्या ज्या ठिकाणी लोक चांगल्या लोकांना मतदान करतात, त्या ठिकाणी गावांचा विकास होतो. त्यामुळे मत टाकण्यासाठी पैसे घेणे अथवा पार्ट्या खाणे हे तत्वतः चुकीचे आहे. त्यामुळे मतदारांनी पारदर्शकतेची भूमिका घेणे गरजेचे असून त्यातूनच गावाचा विकास साधणार आहे. त्यामुळे मतदान करताना कोणता उमेदवार कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा याचा विचार न करता चांगले काम करू शकेल असे मतदारांना वाटते त्यालाच निवडून देणे आवश्यक असते.

मतदारांनी कोणतीही भीती न बाळगता पारदर्शकतेने आपल्याला ज्या उमेदवाराला मत टाकायचे आहे, त्या उमेदवाराला मत टाकावे. मतदान गुप्त असते. आपण कोणाला मत टाकले हे कळत नाही. त्यामुळे मतदारांनी कोणताही दबाव न स्वीकारता दबाव झुगारून मतदान करावे. गुंडागर्दी करणारे आणि जनतेचा पैसा खाणाऱ्या लोकांना निवडणुकीत पाडावे, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button