केजबीड जिल्हा

महिनाभरा पासुन फुटलेल्या जलवाहिनीचे काम होणार तरी कधी? आणि करणार कोण ?

कंपनीचे अधिकारी हाकतात दिल्लीहून दख्खनची सुभेदारी.!

 

एम.इ.एन. लि.. कंपनी खेळतेय सर्वसामान्यांच्या जिवीताशी खेळ.घाण पण्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात .!

कळंब केज रस्त्याचे काम रखडल्याने वाहतुकीची होतेय कोंडी तर व्यवसाय धारकारकांच्या रोजीरोटीचा प्रश्न ? झाला गंभीर.!
महादेव काळे , केज.

सध्या केज शहारातुन जाणाऱ्या दोन राज्यमहामार्गाचे काम सुरू असुन याठिकाणी केज बिड या रस्त्याचे काम एच पि.एम.हि कंपनी करत असुन ते सुस्थितीत असल्याचे आणि नियोजनबद्ध असल्याचे दिसत आहे. मात्र केज ते कळंब राज्य महामार्गाचे काम एम.इ एन.लि.या कंपनिचे असुन हि कंपनी केज ते कुसळंब या ६० कि.मी.चे रस्ता खोदुन भराव करून त्यावरील कॉंक्रिट पर्यंतचे काम हि कंपनी करत आहे. हि कंपनी सदरिल काम अगदी संथ म्हणजे कासव गतीने करत असुन त्यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले दिसत नाही. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. फुटलेल्या पाईपलाईन कडे कंपनीचे कोणी व्यक्ती डुंकून पहायला देखील तयार नाही.त्यामुळे जनतेचे आरोग्य आता धोक्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की केज येथे शहरातुन जाणऱ्या केज बिड व केज कळंब या दोन्ही राज्यमहामार्गावर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून केज बिड या रस्त्याचे काम एच. पि.एम या कंपनीमार्फत केले जात असुन त्यांचे काम नियोजनबद्ध दिसत असले तरी
त्यांनीही शहरातील कळंब चौकापर्यंतच काम केले आहे. तर गेल्या महिन्याभरापासून एम.इ.एन.लि.या कंपनीने ऐन वर्दळीच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी बिड आणि कळंब कडे वाहाणाची ये जा आहे. अगदी त्याच ठिकाणी केज कळंब रस्ता खोदुन ठेवला असुन धनेगाव तलावातून केज शहराला पिण्याच्या पाण्यासाठी येणारी जलवाहिनी रस्त्याचे खोदकाम करत असताना याच कळंब चौकात फुटली असुन त्याद्वारे येणारे पाणी बऱ्याच प्रमाणात या खोदलेल्या ठिकाणी निघून वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी गटारगंगा निर्माण झाली आहे.तर जलवाहिनीचे पाणी बंद केल्यानंतर साठलेल्या गटारगंगेतील पाणी पुन्हा त्या जलवाहिनीत जाते. ते जरी फिल्टर होत असले तरी त्या मुळे सर्वसामान्य जनतेच्या पिण्यासाठी अशुद्धच पाणी वापरले जात आहे. त्यामुळे या अशुद्ध पाण्याचा होणारा अशुद्ध पाणी पुरवठा थांबवुन फुटलेल्या जलवाहिनीचे काम तात्काळ करावे. तसेच रस्त्यावर होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडवावी.व कळंब चौकापासून ते कृषी ऊत्पन्न बाजार समिती केज पर्यंतच्या रस्त्याचेकाम तात्काळ करून छोट्यामोठ्या व्यवसाय धारकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा. अशी मागणी येथील सर्वसामान्य नागरिक , व्यवसाय धारक आणि वाहन चालक करू लागले आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button