बीडबीड जिल्हा

चांगल्या अधिकाऱ्याला जिल्ह्यात टिकू दिलं जात नाही हे दुर्दैव – अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात चांगल्या अधिकाऱ्यांना टिकु दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे. जिल्ह्यात मागासलेपणा राहण्याचे हेच एक मोठं कारण असून सत्तेत कोणीही असलं तरी कायद्याप्रमाणे चालणारा अधिकारी सर्वांना नको आहे. हे नेहमी सिद्ध झालेले आहे. या सरकारच्या काळात देखील अधिकाऱ्यांच्या अशाच बदल्या होत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली होणार हे जिल्ह्यासाठी दुर्दैवी आहे. एक एस.एम.एस. आणि लगेच कारवाई असा रेखावारांचा खाक्या तर होताच, पण त्याच बरोबर त्यांच्यात मोठा समजूतदार पणाही होता, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

कोरोनाणा महामारीचे संकट देश पातळीवर होते. जिल्ह्यात राहुल रेखावार यांनी रात्री तीन-तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ऑफिसमध्ये बसून या महामारी पासून जिल्हा दूर कसा राहील, यासाठी प्रयत्न केले. किंबहुना असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही की. जिल्ह्यात कोरोणा रोखण्यासाठी केवळ आणि केवळ राहुल रेखावार यांचे सर्व खात्यांतील अधिकाऱ्यां बरोबर संपर्क ठेवून असलेले संबंध आणि सर्व अधिकाऱ्यांबरोबर मिळून मिसळून केलेले काम हेच कामी आले.

बदल्यांचा कायदा गुंडाळून ठेवून शासन पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. भ्रष्ट कारभार होण्यासाठी काय काय करता येईल हे पाहिले जाते. मात्र जिल्ह्यातील गोरगरीब लोकांचा उद्धार कसा होईल, योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, हे पाहिले जात नाही.

राहुल रेखावार साहेबांच्या काळामध्ये कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेले प्रयत्न, बोगस एन. ए. आदेशामुळे होत असलेले शासनाचे नुकसान थांबवुन दलालांच्या ठेचलेल्या नांग्या, परळी येथील शंभर कोटीच्या मुद्रांक घोटाळ्याची चौकशी, जिल्ह्यातील तीन तालुक्यात बोगस अकृषी आदेशांचे संदर्भात नियुक्त केलेल्या तिन समित्या, लोकसभा निवडणुकीतील निवडणूक खर्चात सव्वा आठ कोटी रुपयांचा खर्च कमी करणे, रेशन माल गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, एवढेच नाही तर या प्रमाणे कित्येक कामे जनतेच्या दृष्टीने हिताचे ठरले. मात्र ही बदली जिल्हावासीयांच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button