बीड जिल्हा

रेखावारांचा ई-पीक पाहणी प्रकल्प चालू ठेवण्याचा शासनाचा आदेश – अँड. अजित देशमुख

बीड :- बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये ई-पीक पाहणी प्रकल्प सन २०२०-२१ पासून राबविण्यास शासनाकडून परवानगी घेतली होती. हा प्रकल्प चालू ठेवून कामाचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा. असा आदेश शासनाने बीडचे नूतन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिले आहेत. जनतेनेही पिक पाहणी नोंदीबाबत जागरूक रहावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासनाकडे विनंती केल्यानंतर महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ई पीक पाहणी प्रकल्प हा चालविण्यासाठी दि. २३/११/२०२१ रोजी मान्यता दिली होती. बीड जिल्ह्यात सर्वच्या सर्व अकरा तालुक्यात ई-पीक पाहणी पथदर्शी प्रकल्प सन २०२० पासून कार्यान्वित झालेला आहे.

टाटा ट्रस्टच्या मदतीने आणि जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून सर्व सहभागी कर्मचारी व खातेदार यांना प्रकल्पाबाबत प्रशिक्षण चर्चासत्र प्रचार व प्रसिद्धी झाली असून सध्या खातेदार नोंदणी व पिक पाहणीच्या नोंदी घेण्याची प्रक्रिया चालू आहे.

या प्रकल्पाची उपयुक्तता लक्षात घेऊन पीक पाहणी प्रकल्पासाठी शंभर टक्के खातेदारांची नोंदणी व पिकाच्या नोंद घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे आणि कामाचा प्रगती अहवाल अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांना व जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र, पुणे यांना वेळोवेळी सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी बीड यांना जमाबंदी आयुक्त आणी संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी दिले आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी बाबत जागरुक रहावे. आवश्यक त्या त्यावेळी प्रशासनाकडून याची माहिती घ्यावी. ज्या ज्या ठिकाणी कार्यशाळा, चर्चासत्र, प्रसिद्धी चालू असेल, त्या त्या ठिकाणी खातेदारांनी लक्ष द्यावे. शंभर टक्के खातेदारांची नोंदणी यात होण्यासाठी प्रत्येक खातेदाराने महसूल विभागातील आपल्या गावातील कर्मचाऱ्याकडे तसेच तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button