बीडबीड जिल्हा

बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न

प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिन समारंभानिमित्त दिल्या नागरीकांना शुभेच्छा

बीड, दि. २६ जानेवारी २०२०:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालय मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

पालकमंत्री श्री मुंडे यांनी याप्रसंगी जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय प्रजासत्ताक निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या वीर शहिदांना अभिवादन करत राज्यघटना लिहिणाऱ्या संविधान कर्त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले.

यावेळी कोरोना आजारावर संशोधकांनी लस शोधण्यात यश मिळवण्याचा उल्लेख करून सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीची निर्मिती केली जात आहे महाराष्ट्र सरकारने यासाठी दिलेला पाठींबा महत्वपूर्ण आहे. अमेरिका, रशिया या देशांच्या बरोबरीने भारताची कामगिरी झाली असून त्याचा आनंद व्यक्त केला या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत उत्साहाने पार पडला.

आज सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलिस अधिक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, कोरोनाच्या आपत्तीमधून बाहेर पडत असताना अनलॉकसाठी प्रक्रिया आपण सुरु केल्यानंतर मागील सहा महिन्यात टप्प्या टप्प्याने अनेक उद्योग व्यवसाय पूर्वपदावर आणले आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, म्हणून सावधगिरीने पावलं टाकली जात आहेत. जनजीवन पूर्वी सारखे होत असताना कोरोना लसीकरण मोहिमेला आपण सुरुवात केली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्‌यात जिल्ह्याच्या वैद्यकिय क्षेत्रातील जवळपास १७ हजार नागरीकांना मोफत लस दिली जात आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव व आष्टी येथील शासकिय रुग्णालयांत सोय करण्यात आली आहे. येथून आत्तापर्यंत ३००८ नागरिकांना मोफत लस देण्यात आली आहे.

ते म्हणाले, पिक पाहणीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग घेऊन ई पीक पाहणी प्रयोग राज्यात पहिल्यांदा बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. रमाई आवास योजनेत मागील वर्षासाठी उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले असून या उद्दिष्ट व्यतिरिक्त अजून 3 हजार 188 घरकुलांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसाय स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून अकराशे शहान्नव प्रस्तावांना शिफारस दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून यावर्षी एकूण जवळपास 394 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे त्यापैकी जिल्ह्यास 305 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यातील सर्वसाधारण योजनेत 288 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेत 92 कोटी रुपये आणि आदिवासी बाह्यक्षेत्र उपयोजना यातून 1 कोटी 74 लाख‍ रुपये आहेत. जनतेसाठी असंख्य कामे पूर्ण केली जातील असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ध्वजारोहन समारंभानंतर हस्ते बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आर.राजा यांचा राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर झाल्याने सत्कार करण्यात आला तसेच विभागीय स्तर स्वच्छता पूरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक, गुणवत्ता पूर्ण कामगिरी करणार्‍या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांचा
यांचा प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यानंतर झालेल्या संचालनात पोलीस दलाच्या विविध पथकांनी सहभाग व मानवंदना दिली यासह संचलनात पोलीस दलाचे वरूण वाहन , वज्र वाहन, अँम्ब्युलन्स, कृषी विभागाचा चित्ररथ यांनी सहभाग घेतला
ध्वजारोहण समारंभास अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीड जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीक यांची भेट घेऊन पालक मंत्री श्री मुंडे यांनी सदिच्छा दिल्या
०००००

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button