गेवराईबीड जिल्हा

गेवराई मतदार संघाच्या विकासाची नाळ कधीही तुटू देणार नाही—विजयसिंह पंडित

चार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ संपन्न

सर्व विकासकामे दर्जेदार
करण्यावर आमचा भर
गेवराई, – सत्ता असो नसो आमचा संघर्ष सदैव लोकल्याणासाठी चालू आहे, गेवराई विधानसभा मतदार संघाच्या विकासाची पंडित परिवाराशी जोडलेली नाळ कधीही तुटू देणार नाही, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची वाटचाल सदैव यापुढेही चालू राहील त्यात खंड पडू दिला जाणार नाही, सरकार आपले आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही. होणारी कामे दर्जेदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.
गेवराई तालुक्यात सुमारे चार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई तालुक्यातील मौजे चकलांबा येथील जि.प.माध्यमिक शाळा इमारत, उमापूर आणि चकलांबा येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, राज्यमार्ग ते दैठण रस्ता, मादळमोही ते शहाजानपूर रस्ता, रेवकी ते लुखामसला रस्ता, बोरगाव (जुने) ते पैठण पालखी मार्ग रस्ता या रस्त्यांचे डांबरीकरण आणि मौजे खळेगाव येथील को.प.बंधार्यांचे बांधकाम या सुमारे चार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते मंगळवार, दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब मस्के, खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, माजी जि.प.सदस्य डॉ.विजयकुमार घाडगे, पं.स.सदस्य तय्यबभाई, परमेश्‍वर खरात, जयसिंग जाधव, जयभवानीचे संचालक राजेंद्र वारंगे, माजी सभापती बबनराव मुळे, पांडुरंग कोळेकर, जिल्हा बँकेचे संचालक कैलास नलावडे, सरपंच प्रताप पंडित, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या कामांचा झाला शुभारंभ
================
बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदार संघात सुमारे चार कोटी रुपयांची कामे होत आहेत. यामध्ये मौजे चकलांबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी १०० लक्ष रु., मौजे चकलांबा येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी २५ लक्ष रु., मौजे उमापूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी २५ लक्ष रु., राज्यमार्ग ५० ते लुखामसला-दैठण रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कामासाठी ६७ लक्ष रु., मादळमोही ते शहाजानपूर रस्त्याच्या डांबरीकरणासह चार नळकांठी पुलाचे बांधकाम करण्यासाठी ४४ लक्ष रु., रेवकी ते लुखामसला रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३९ लक्ष रु., मौजे बोरगाव (जुने) ते पैठण पालखी मार्ग रस्ता डांबरीकरणासाठी २२ लक्ष रु. आणि मौजे खळेगाव येथील को. प. बंधा-याच्या बांधकामासाठी ८७ लक्ष रु. यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने कधी खचलो नाहीत तर पराभव पचवून गेवराई तालुक्यातील जनतेच्या विकासाच्या प्रयत्नात कायम राहिलो. मतदार संघाच्या विकासाशी असलेली नाळ आम्ही कधीही तुटू दिली नाही. विकास कामात कधी खंड पडू दिला नाही यापुढील काळातही विकासाच्या कामाचा यज्ञ कायम सुरू ठेवला जाईल. निवडणुकीनंतर गेल्या वर्षभरात तालुक्याच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. ते प्रश्न जनतेने भैय्यासाहेबांच्या लक्षात आणून दिले त्यामुळे भैय्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रश्न पाठपुरावा करून सोडवत आहोत. ग्रामीण भागाच्या मूलभूत विकासाच्या कामात कधी खंड पडू दिला जाणार नाही. होणारी सर्व कामे दर्जेदार केले जातील, याकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. ग्रामस्थांनी होणारे काम दर्जेदार होत आहे की नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या सहकार्या शिवाय होणारी कामे पूर्णत्वास जाणार नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी विकासाच्या कामामध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सर्व कार्यक्रमाला शहजाणपूर येथे
कैलास नलावडे, पांडुरंग कोळेकर, बळीराम रसाळ, राजेंद्र वारंगे, जयसिंग जाधव, संभाजी पवळ, शेख समशेर, कल्याण जेधे, शरद यमगर, शरद नलावडे, अशोक पवळ, सुरेश पवळ, सोमेश्वर गचांडे, शिवाजी जेधे चकलांबा येथे सुरेशराव जाजू, गांधले मामा, राधाकिसन शेंबडे, तिर्थराज मदने, शेख पाशूभाई, सोपान गावडे, मारोती घुमरे, श्रीकृष्ण गुंजाळ, मदनराव खेडकर, शिवाजी गाडे, अशोक गुंजाळ, दिलीप दौंड, संतोष घाडगे, एस. के. देशमुख तसेच खळेगाव येथे बंडू आहेर, योगीराज आहेर, योगेश शिंदे, महेश आहेर, संपत कर्हे तसेच उमापूर तुळशीदास औटी, बप्पासाहेब आहेर, रफिक सौदागर, अजय औटी, रावसाहेब देशमुख, बळीराम खराद, शेख अकबरभाई, शेख खलिद, शम्मूभाई, बद्रीनारायण दिवान, नितीन पवार तसेच बोरगाव येथे संजय जाधव, अशोक जाधव, राहुल जाधव, कल्याण जाधव, नंदू गोर्डे, बंडू गवारे, तोसीब पटेल, भाऊसाहेब जाधव, शिवाजी तोतरे, डिगंबर जाधव, लक्ष्मण जाधव, गुलाब वाकडे, कट्टूभाई शेख आणि लुख्खामसला येथे अशोक पंडित, चंद्रकांत पंडित, बाळासाहेब पंडित, अशोक नखाते, विजय जामकर, अजय पंडित, नितीन पंडित, रावसाहेब काळे, श्याम शिंदे, अतुल पंडित, रमेश जामकर, अजित पंडित, बप्पासाहेब पंडित, अज्जूभाई सौदागर, कचरू येवले, लिंबाजी खोटे, गजानन काळे, विराम नलभे, रामेश्वर काळे आदी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button