गेवराईबीड जिल्हा

धोंडराई माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पालकांनी व्यक्त केले आभार तर स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने शाळेचे कौतुक

गेवराई: जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, धोंडराई येथे मंगळवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज पौळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता पाचवीच्या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भक्तराज पौळ तर प्रमुख पाहुणे म्हणून भरतदादा खरात, नारायणराव नवले, मच्छिंद्रनाना खरात, सरपंच अशोक वंजारे, मधुकरराव ढेंबरे, बळीराम कऱ्हे, भागवत ढेंबरे, सचिन खरात, उध्दव साखरे, रामराव काकडे, मच्छिंद्र सपकाळ, अरुण खरात, चव्हाण एल.एल, गायकवाड, गोविंद ढेंबरे सह आदि उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता पाचवीच्या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्यामध्ये शाळेचा ड्रेस, स्कुल बॅग,पाण्याची बाॅटल, वही, पेन इत्यादींंचा समावेश आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अमरसिंहजी पंडित, सचिव जयसिंहजी पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, अमृत डावकर यांनी कौतुक केले तसेच पालकांनी शाळेचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहिरे, पाठक, काकडे, काझी, पिसाळ, गाडे, खोजे, शिंगाडे, शेख राजु, बंडु आबूज सह आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button